कोलवाळ येथील दत्त छाया कला आणि सांस्कृतिक मंडळ तफै ६१ वा गोवा मुक्ती दिन साजरा

.
अस्नोडा वाताहार
कोलवाळ येथील दत्त छाया कला आणि सांस्कृतिक मंडळ तफै ६१ वा गोवा मुक्ती दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी प्राचार्य मोहनराव देशपांडे उपस्थित होते.
ध्वजारोहण झाल्य नंतर श्री. देशपांडे यांनी सांगितले की गोवा मुक्ती लढ्यासाठी ज्ञात व अज्ञात अशा शहिदांना क्षदांजली वाहिली. १९६१ साली १९ डिसेंबर ला गोवा स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्व. राम मनोहर लोहिया यांचे योगदान महत्त्वाचे होते असे सांगून ते पुढे म्हणाले की आपला चुलत बंधू सुद्धा लढ्यामध्ये सामिल होता. त्याने त्यावेळेस गोवा आकाशवाणी फोडण्याचे काम केले होते ते केद्र पोतुगीज चालवत होते. मधू लिमये, बाबूराव ठाकूर, सुधीर फडके, ब्रांगाझा, हिरवे गुरुजी, सुधाताई जोशी, या अशा देशप्रेमीनी लढ्यात भाग घेवून जुलमी पोतुगीज असहाय्य छळ सहन केला होता. या साराचे स्मरण करण्याचा हा दिवस असल्याने ते म्हणाले.
सुरुवातीला अध्यक्ष सुमन कनयाळकर यांनी स्वागत केले. माजी सरपंच बाबनी साळगावकर यांनी आभार मानले. यावेळी डॉ. सुकाजी नाईक माहिती खात्याच्या संचालिका वर्षा नाईक यांची विशेष उपस्थित होती. फोटो भारत बेतकेकर
कोलवाळ येथे ध्वजारोहण करताना मोहनराव देशपांडे, बाजूला बाबनी साळगावकर, डॉ. सुकाजी नाईक, वर्षा नाईक.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar