MMTC-PAMP ने २४ कॅरेट ९९९.९ शुद्ध गोल्ड बार असलेल्या आपल्या उत्सवी एडिशनचे केले अनावरण

.

MMTC-PAMP ने २४ कॅरेट ९९९.९ शुद्ध गोल्ड बार असलेल्या
आपल्या उत्सवी एडिशनचे केले अनावरण
खास तयार केलेल्या या सोन्याच्या बारवर एका बाजूला प्रभु येशू ख्रिस्ताची प्रतिमा कोरलेली आहे तर दुसरीकडे ख्रिस्ताचे पवित्र हृदय
येशूच्या पवित्र हृदयाची सर्वात आदरणीय आणि पवित्र प्रतिमा या २४के ९९९.९ शुद्ध गोल्ड बार वर मिळू शकते

नवी दिल्ली, XX डिसेंबर २०२२: सणासुदीचा काळ आणि सगळ्या पवित्र गोष्टींना मानवंदना म्हणून भारतातील एकमेव लंडन बुलियन मार्केट असोसिएशन (LBMA) गुड डिलिव्हरी सोने आणि चांदी रिफायनरी MMTC-PAMP ने आपल्या उत्सवी संग्रहाचे अनावरण केले आहे. या संग्रहातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरण म्हणजे ‘लॉर्ड जिझस गोल्ड बार’. तारणहार असलेल्या येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी आणि ज्याने पहिल्यापासून मानवजातीला मार्गदर्शन केले अशा ख्रिस्ताच्या शिकवणींचे स्मरण करण्यासाठी हे सादर करण्यात आले आहे.

ख्रिसमस ही वार्षिक पवित्र ख्रिश्चन सुट्टी आहे जी ख्रिस्ती धर्माचे आध्यात्मिक नेते आणि संस्थापक येशू ख्रिस्त यांच्या जन्माचे स्मरण करते. अनेक लोक येशूच्या जन्माचा सन्मान करण्यासाठी नाताळ साजरा करतात, तर जगभरात सांस्कृतिक सुट्टी म्हणूनही हा काळ साजरा केला जातो. ट्विंकल लाइट्स, फुले आणि झिरमिळया तर वर्षाच्या या वेळी सर्वव्यापी असतात, एग्नोग्स आणि मल्ड ड्रिंक्स हवीहवीशी लज्जत वाढवितात.

१० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बारवर कोरण्यात आलेली प्रतिमा ही येशूची सर्वात लोकप्रिय प्रतिमा आहे आणि ती येशूचे पवित्र हृदय म्हणून देखील ओळखली जाते. हे प्रतीक प्रेमाचे प्रतिनिधित्व करते जे पापावर विजय मिळवते आणि मृत्यूच्या पलीकडे जाते. ज्याने मृत्यूपर्यंत सर्वांवर प्रेम केले त्याचे खरे प्रतिनिधित्व. हे बार लवकरच सुरू होणाऱ्या नवीन वर्षाची आशा देखील पल्लवित करतात.

या घोषणेबद्दल बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. विकास सिंग म्हणाले, “जगभर सेलिब्रेशनची ही वेळ आहे आणि MMTC-PAMP मध्ये, आम्ही आमच्या ग्राहकांना सांस्कृतिकदृष्ट्या संबंधित आणि उत्कृष्टपणे तयार केलेली उत्पादने देण्याचा नेहमीच प्रयत्न करतो. आपले कुटुंब आणि मित्रांप्रति सद्भावना आणि दयाळूपणाचा प्रसार करण्याची भावना आणि एखाद्याचा असलेला विश्वास साजरा करण्यासाठी हे बार खास तयार करण्यात आले आहेत. उत्पादन जगभरातील ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नवीनतम स्विस तंत्रज्ञान वापरून उच्च मानकांवर तयार केले गेले आहे. यासाठीचे पॅकेजिंगही विशेष असून आपल्या प्रियजनांना भेटवस्तू म्हणून देण्यासाठी किंवा त्यांना आशीर्वाद देण्यासाठीची ही २४के ९९९.९ शुद्ध सोन्यातील आदर्श भेट आहे.”

ख्रिसमसच्या नाण्यांसारख्या इतर ख्रिसमस योजनांसह येशू गोल्ड बार MMTC-PAMP च्या खास आउटलेट किंवा वेबसाइटवर, आघाडीचे दागिने भागीदार किंवा अॅमझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ऑनलाइन भागीदारांद्वारे खरेदी केले जाऊ शकतात. २० ग्रॅम वजनामध्ये उपलब्ध असलेल्या या ९९९.९ शुद्ध नाण्यांमध्ये होली, रेनडिअर आणि ख्रिसमसची उत्कृष्ट प्रतिमा आहे.

उत्पादनाची सत्यता सुनिश्चित करण्यासाठी, प्रत्येक MMTC-PAMP उत्पादनामध्ये एक विशिष्ट क्रमांक असतो आणि तो योग्य पारख असलेल्या निरीक्षकाकडून स्वाक्षरी केलेल्या प्रमाणित स्वरूपात पॅकेज केलेला असतो. MMTC-PAMP कडून खरेदी केलेले प्रत्येक सोने आणि चांदीचे उत्पादन वजन आणि शुद्धता यांचा योग्य समतोल राखतो. तुम्ही खरेदी करता त्या प्रत्येक नाणे किंवा बारचे वजन सूचीबद्ध वजनापेक्षा जास्त असेल अशी हमी यातून मिळते जेणेकरून ग्राहकांना त्यांच्या गुंतवणुकीचे सर्वोच्च मूल्य मिळायची खात्री होते.

सर्व उत्पादने MMTC-PAMP च्या अस्सलतेच्या शिक्क्यासह येतात आणि ९९९.९+ शुद्धतेचे वचन देतात आणि नवीनतम स्विस तंत्रज्ञान वापरून सर्वोच्च मानकांनुसार तयार केले जातात. आता शुद्ध सोने आणि चांदीच्या उत्पादनांमधून निवडण्यासाठी विविधता आहे आणि कोणीही ती MMTC-PAMP च्या विशेष दालनांमधून, आघाडीचे ज्वेलर्स पार्टनर्स, अॅमझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ऑनलाइन मार्केटप्लेसमधून किंवा थेट MMTC-PAMP च्या स्वतःच्या वेबसाइट shop.mmtcpamp.com वरून खरेदी करू शकतात.
About MMTC PAMP: A joint venture between Switzerland-based bullion brand, PAMP SA, and MMTC Ltd, a Government of India Undertaking, MMTC-PAMP seamlessly marries Swiss excellence with Indian insights. MMTC-PAMP India Pvt. Ltd. is internationally recognized as an industry leader in bringing global standards of excellence to the Indian precious metals industry. We have received several awards since our inception from local and global industry bodies for the transparency and sustainability that we rigorously uphold in our sourcing, refining and supply of precious metals in the Indian market. MMTC-PAMP is the only LBMA-accredited Gold & Silver refinery in India and is accepted across global commodity exchanges and central banks.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar