संपूर्ण भारतातील १ लाखांहून अधिक ग्राहकांसाठी ओला तर्फे मूव्हओएस३ ची सुरुवात

.

संपूर्ण भारतातील १ लाखांहून अधिक ग्राहकांसाठी ओला तर्फे मूव्हओएस३ ची सुरुवात


India,2022- ओला इलेक्ट्रिक या भारतातील सर्वांत मोठ्या इव्ही उत्पादक कंपनी ने आज त्यांच्या मूव्हओएस३ या सर्वांत मोठ्या अत्याधुनिक सॉफ्टवेअर अपडेटच्या सार्वजनिक वितरणाची सुरुवात केल्याची घोषणा केली. देशपातळीवरील या नवीन अपडेट मुळे आता संपूर्ण भारतातील १ लाखांहून अधिक ओला ग्राहकांना ओव्हर द एअर (ओटीए) अपडेट्स प्राप्त होणार आहेत. यामुळे आता देशातील तंत्रज्ञानाने सर्वात आधुनिक आणि वैशिष्ट्यांनी युक्त अशा दुचाकीचा संपूर्ण क्षमतेने वापर करणे ग्राहकांना शक्य होणार आहे.

मूव्हओएस ३ हे ओलाचे या वर्षातील तिसरे मोठे सॉफ्टवेअर अपडेट असून हे आता नवीन आणि सध्याच्या ओलाच्या एस१ परिवारातील स्कूटर्स साठी उपलब्ध असेल. बहुप्रतिक्षित अशा या सॉफ्टवेअर अपडेट मुळे स्कूटरची कार्यक्षमता तर वाढेलच पण त्याच बरोबर सुधारीत ॲक्सेस सह अनोखा बेजोड राईड अनुभव आणि सोपेपणा वापरकर्त्यांना मिळून कंपनीच्या वेगाने वाढणार्‍या व सध्या भारतातील २७ राज्यात असलेल्या हायपरचार्ज नेटवर्कशीही जोडणी होऊ शकेल. वापरकर्त्यांना आता ओला हायपरचार्जर्सच्या माध्यमातून ५० किमी ची अधिकची रेंज ही १५ मिनीटांच्या फास्ट चार्जिंग मुळे प्राप्त होणार आहे.

ओला इलेक्ट्रिक चे संस्थापक आणि सीईओ भावीश अग्गरवाल यांनी सांगितले “ वचन दिल्या प्रमाणे आम्ही मूव्हओएस३ ची सुरुवात या आठवड्यात आमच्या सर्व ओला एस१ मालकांसाठी करत आहोत. वर्षभराच्या कालावधीत हे तिसरे मोठे सॉफ्टवेअर अपडेट आहे. मला माझ्या इंजिनियर्सचा अभिमान वाटतो कारण त्यांच्यामुळे हे जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान अशा वेगाने उपलब्ध झाले. ओला मध्ये आम्ही नेहमीच सर्वोत्कृष्ट उत्पादने तयार करत असतो आणि त्यानंतर ते अधिक चांगले करण्यावर भर देत असतो. मूव्हओएस२ हे काळाच्या खूपच पुढे होते, यामध्ये दुचाकीत प्रथमच अनोखी वैशिष्ट्ये देण्यात आली होती. मूव्हओएस३ मुळे भारतातील आवडीची स्कूटर अधिक चांगली आणि खरोखरच सर्वसमावेशम मशीन बनून ईव्ही दुचाकींच्या प्रगतीचा वेग हा देशात आणि जगभरात वाढू शकेल.”

मूव्हओएस३ अपग्रेड मुळे आता ओला एस१ प्रो आणि ओला एस१ ला मध्ये ५० हून अधिक वैशिष्ट्ये आणि सुधारणा प्राप्त होतील, या सुधारणा परफॉर्मन्स, ॲक्सेस आणि कन्व्हिनियन्स या तीन स्तंभांवर आधारीत आहेत-

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar