मये येथे २५ डिसेंबरला हिंदु राष्ट्र-जागृती सभा

.

 

 

*मये येथे २५ डिसेंबरला हिंदु राष्ट्र-जागृती सभा !*
मये, २४ डिसेंबर – देशभरात केवळ हिंदूंच्याच मंदिरांचे सरकारीकरण, तर मशिदी-चर्चचे सरकारीकरण का नाही ? अल्पसंख्याकांना धर्माच्या आधारावर शैक्षणिक अनुदान, मग बहुसंख्य हिंदूंनी काय अपराध केला आहे ? हे सर्व पहाता भारतात खरोखरच ‘सेक्युलर’ व्यवस्था अस्तित्वात आहे का ? हिंदूंच्या हजारो युवतींना उद्ध्वस्त करणारा नवा आतंकवाद म्हणजे ‘लव्ह जिहाद’. भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे संकट ‘हलाल जिहाद’ यांसारख्या हिंदूंवर होणार्‍या अनेक अन्यायांना वाचा फोडण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रविवार, २५ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ५ वाजता श्री माया केळबाय पंचायतन देवस्थान सभागृह, गावकरवाडा, मये, डिचोली येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला अधिकाधिक हिंदूंनी उपस्थिती लावावी, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे.

आपला विश्वासू,
*डॉ. मनोज सोलंकी*
हिंदु जनजागृती समितीकरिता
(संपर्क क्रमांक : ९३२६१०३२७८)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar