गणेशपुरी,म्हापसा येथील ‘विद्या भारती,गोवा’ संचालित श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालयाचा क्रीडा व सांस्कृतिक मेळावा तथा गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा नुकताच पेडे, म्हापसा येथील दयानंद बांदोडकर क्रीडा संकुलात संपन्न

.

गणेशपुरी,म्हापसा येथील ‘विद्या भारती,गोवा’ संचालित श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालयाचा क्रीडा व सांस्कृतिक मेळावा तथा गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा नुकताच पेडे, म्हापसा येथील दयानंद बांदोडकर क्रीडा संकुलात संपन्न झाला.
या सोहळ्यास प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते शिवशंकर मयेकर हे प्रमुख अतिथी म्हणून,तर नगरसेविका डॉ.नूतन बिचोलकर व गणेशपुरी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष सत्यवान भिवशेट हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
विद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्राचार्य ज्ञानेश्वर पेडणेकर, व्यवस्थापक पुरुषोत्तम कामत, प्राचार्य गजानन मांद्रेकर,पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेंद्रकुमार तारकर,माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष राधाकृष्ण साळगांवकर, विद्यार्थी मंडळ सचिव सिया तेंडुलकर,गोवा विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दिलीप महाले, सचिव जीवन मिशाळ, सहसचिव प्रशांत बर्वे व श्रीगणेश विद्यामंदिरचे प्रधानाचार्य रुपेश सावंत हे मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
‘विद्या भारती,गोवा’ संचालित सर्व विद्यालयांचे नाविन्यपूर्ण उपक्रम कौतुकास्पद असून,या सर्व विद्यालयांच्या शैक्षणिक विकासासाठी आपला ‘शिवानी शैक्षणिक न्यास’ कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन प्रमुख अतिथी शिवशंकर मयेकर यानी यावेळी बोलताना केले.
विशेष अतिथी डॉ.नूतन बिचोलकर व सत्यवान भिवशेट यानी आपल्या भाषणांत श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालयाने अल्पावधीत मारलेल्या भरारीचे कौतुक केले.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सोहळ्यास प्रारंभ झाला.आचार्य शिल्पा पै पाणंदीकर यानी स्वागत करून मान्यवरांचा परिचय केला.प्राचार्य गजानन मांद्रेकर यानी वार्षिक अहवाल सादर केला.अध्यक्ष प्राचार्य ज्ञानेश्वर पेडणेकर यानी समारोपाच्या भाषणात विद्यालयाचे आचार्य व इतर कर्मचाऱ्यांचे, तसेच पालकवर्गाचे विद्यालयाच्या विकासासाठी घेत असलेल्या परिश्रमांबद्दल कौतुक केले.
मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला.
तद्नंतर विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा तथा नृत्य प्रकारांचे नेत्रदीपक सादरीकरण केले.
आचार्य नारायण गांवस,श्रद्धा केपेकर व नेहा मडकईकर यानी कौतुक सोहळ्याचे सूत्रसंचालन केले,तर संध्या आरोलकर व सोनिया बर्वे यानी सांस्कृतिक कार्यक्रमाचे निवेदन केले. आचार्य अभय सावंत यानी शेवटी ऋणनिर्देश केला.
(छायाचित्र: श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालयाच्या कौतुक सोहळ्यात बक्षीस वितरण करताना शिवशंकर मयेकर.सोबत डॉ.नूतन बिचोलकर, सत्यवान भिवशेट व अन्य मान्यवर.)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar