केरी न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये राष्ट्रीय गणित दिन साजरा
केरी पेडणे येथील न्यू इंग्लिश हायस्कुलमध्ये राष्ट्रीय गणित दिवसानिमित्त गणितीक प्रश्नमंजुषा, माहितीपर आणि मनोरंजन कार्यक्रम संपन्न झाला.
शाळेच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे संपूर्ण संचालन शाळेचे गणित शिक्षक सर्वेश कोरगावकर, निषिता आकरकर आणि वैशाली न्हांजी यांनी केले होते.
यावेळी दहावीचा विद्यार्थी विनायक गोवेकर, सहावीचे विद्यार्थी गतिक कासकर, अद्विद केरकर आणि निधी भरणे यांनी श्रीनिवासा रामानुजन यांनी गणित विषयात केलेलय अजरामर कामगिरीची माहिती दिली. सातवीच्या विद्यार्थिनी वैष्णवी राणे आणि सिद्धी पेडणेकर यांनी भारतीय गणित विषयाचे जनक आर्यभट्ट यांनी जागतिक गणितीक क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाच्या स्मृतीना उजाळा दिला. पाचवीचे विद्यार्थी अथर्व देवजी आणि सक्षम राणे यांनी ब्राह्मगुप्त या आणखीन एका गणितज्ञा विषयी माहिती दिली.
यानंतर घेतलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत ब्लू हाऊज विजेता ठरला. याचे संपूर्ण संचालन संगणकाच्या सहाय्याने करण्यात आलेले. तर त्याचे निवेदन सर्वेश कोरगावकर यांनी केले. तर इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी मॅथस में डब्बा गुल या गाण्यावर नृत्य सादर केले.
मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर यांनी याप्रसंगी गणित विषयाचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्व असल्याचे सांगताना म्हटले की, माणसाच्या जन्मापासून मृत्युपर्यंत आणि त्याच्या दिवसाच्या प्रारंभापासून ते रात्री तो झोपेपर्यंत गणित हा त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग असतो. रामानुजन, आर्यभट्ट अशा महान गणितज्ञानी वैश्विक स्थरावर भारताचे नाव उज्ज्वल केले. त्यांचा वारसा विद्यार्थ्यांनी जपावा. गणित विषयाकडे नकारात्मकतेने न पहात त्याचे आवडीने आणि मनोरंजन म्हणून अध्ययन करावे. तेव्हाच आपल्या भारतात पुन्हा एकदा आर्यभट्ट , रामानुजन सारखे थोर गणितज्ञ एकविसाव्या शतकात निर्माण होतील.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नववीची विद्यार्थिनी तन्वी शेट्ये हिने केले. तर दहावीची विद्यार्थिनी तन्वी परब हिने ऋणनिर्देश केले.
फोटो
केरी पेडणे येथे न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये आयोजित राष्ट्रीय गणित दिवसानिमित्त आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेचे संचालन करताना शिक्षक सर्वेश कोरगावकर, सोबत शिक्षिका वैशाली न्हांजी व विद्यार्थी.