हिंदु जनजागृती समितीची म्हापसा येथे निदर्शनाद्वारे मागणी*_

.

 

 

_*हिंदु जनजागृती समितीची म्हापसा येथे निदर्शनाद्वारे मागणी*_
*‘सनबर्न’ महोत्सवाला दिलेली मान्यता रहित करा !’*
म्हापसा, २४ डिसेंबर – अमली पदार्थांच्या मुक्त सेवनाची पार्श्वभूमी लाभलेल्या ‘सनबर्न’ या ‘ईडीएम्’ महोत्सवाला दिलेली मान्यता शासनाने त्वरित रहित करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने म्हापसा येथे नगरपालिका मार्केट प्रवेशद्वार (सार्वजनिक गणेशोत्सव मंडप) या ठिकाणी २४ डिसेंबर या दिवशी सायंकाळी निदर्शनाद्वारे केली. या आंदोलनामध्ये सुराज्य न्यास, भारत माता की जय, विद्या भरती, गोमंतक मंदिर महासंघ, शिवसेना, सनातन संस्था आणि स्वराज्य संघटना आदी संघटनांनी सहभाग घेतला. गोव्यात २७ ते ३० डिसेंबर २०२२ या कालावधीत ‘सनबर्न महोत्सवा’चे आयोजन होत आहे. या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली.
आंदोलनाला स्थान देवता नारळ ठेवल्यानंतर प्रार्थनेने प्रारंभ झाला. यानंतर ‘भारत माता की जय’ संघटनेच्या अधिवक्त्या सौ. रोशन सामंत, सुराज्य न्यासाच्या श्रीमती चंद्रीका पाडगावकर, सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. गोविंद चोडणकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. आंदोलनामध्ये पुढील मागण्या मांडण्यात आल्या. ‘सनबर्न’ सारख्या ‘ईडीएम्’ महोत्सवाला अमली पदार्थाच्या मुक्त सेवनाची पार्श्वभूमी लाभलेली आहे. ‘ईडीएम्’मध्ये अमली पदार्थांच्या अतीसेवनाने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. या घटनांमुळे देवभूमी गोव्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर अपकीर्त झाले आहे. गोवा अमली पदार्थमुक्त करणे, खरेतर अपेक्षित आहे; मात्र पर्यटनाच्या नावाने ‘ईडीएम्’ला प्रोत्साहन देणे म्हणजे एकप्रकारे अमली पदार्थ व्यवसायाला अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन देण्यासारखे होणार आहे. ‘सनबर्न’सारखे ‘ईडीएम’ महोत्सव युवा पिढीला व्यसनाधीन बनवणारे आणि पाश्चात्त्य विकृतीचे उदात्तीकरण करणारे आहेत. गोव्याची युवा पिढी व्यसनाधीन होऊन पाश्चात्त्य विकृतीच्या आहारी गेली, तर ते योग्य होणार नाही. ‘सनबर्न’चे आयोजन करणे, हा संस्कृतीद्रोह आहे. शासनाने युवा पिढीला व्यसनाधीन बनवणार्‍या ‘ईडीएम्’ महोत्सवांना गोव्यात अनुज्ञप्ती देऊ नये. गोवा ‘ईडीएम्’ मुक्त करावे. ‘सनबर्न’ महोत्सवाला शासनाने दिलेली मान्यता त्वरित रहित करावी आणि कार्यक्रमाची तिकीटविक्री बंद करावी. गोव्याची सांस्कृतिक अस्मिता जपावी. आंदोलनाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुशांत दळवी यांनी केले.

आपला विश्वासू,
*डॉ. मनोज सोलंकी,राज्य समन्वयक,*
हिंदु जनजागृती समितीकरिता, (संपर्क क्रमांक : ९३२६१०३२७८)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar