न्यू इंग्लिश हायस्कुल केरी पेडणेत ख्रिस्तमस उत्साहात साजरा

.

न्यू इंग्लिश हायस्कुल केरी पेडणेत ख्रिस्तमस उत्साहात साजरा

न्यू इंग्लिश हायस्कुल, प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक विद्यालय, केरी पेडणे येथे ख्रिस्तमस उत्साहात साजरा करण्यात आला. स्थानिक चर्चचे फादर हर्मोजेनिस हे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना फादर हर्मोजेनिस म्हणाले की, ख्रिस्तमस सण हा प्रेम आणि जिव्हाळ्याचा सण आहे. समाजातील गरीब, दुर्बळ आणि वंचित लोकांना मदतीचा हात देऊन त्यांना जीवन जगण्यास मदत करणे हेच ख्रिस्तमस सणानिमित्त प्रत्येकाने काम केले तर ती प्रभू जीजसला मोठी भेट ठरणार आहे. त्यासाठी जात, धर्म या कोषातून बाहेर पडून आपण मानवतेच्या कल्याणासाठी जगावे हाच संदेश ख्रिस्तमस सण संपूर्ण विश्वाला देतो असे फादर म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर, वरिष्ठ शिक्षिका निषिता आकरकर, सत्यवान हर्जी उपस्थित होते.

शाळेच्या माध्यमातून विबिध सण साजरे करून आपण आपल्या विविधतेत एकता दडली आहे. हा महान पारंपरिक वारसा मुलांनी जपणे आवश्यक असून प्रत्येक संस्कृतीची आपल्या मुलांना ओळख होईन सर्वात स्मानतेची मूल्ये पेरली जावी ही सांस्कृतिक सण, कार्यक्रम साजरा करण्यामागे शाळेचे उद्दिष्ट असल्याचे मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर यांनी आपल्या भाषणात म्हटले.

ख्रिस्तमस सणानिमित्त शाळेत भेट कार्ड, स्टार आणि ख्रिस्तमस वृक्ष सजावट साहित्य निर्माण करणे अशा स्पर्धा घेऊन त्यांचे मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षिसे वितरित करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिशा डिगामा आणि निकिता मठकर यांनी केले. शमा गडेकर यांनी आभार मानले. आल्फ्रेड रोड्रिगीज यांनी फादर हर्मोजेनिस यांनी गायलेल्या डॉ घाणेकर आणि मनोहरराय सरदेसाई लिखित ख्रिस्तमस गाण्यांना गिटारवर संगीत साथ दिली.
तसेच मुलांनी ख्रिस्तमसनिमित्त विविध कॅरल गाणी आणि त्यावर नृत्य सादर करून मनोरंजनाचा कार्यक्रम सादर केला.

फोटो
1. केरी पेडणे येथें ख्रिस्तमसनिमित्त कार्यक्रमात बोलताना फादर हर्मोजेनिस. सोबत मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर, निषिता आकरकर, सत्यवान हर्जी.
2. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा प्रत्यक्ष देखावा सादर करताना न्यू इंग्लिश हायस्कुलची मुले.
3 सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना मुले

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar