*परिवर्तन स्मार्टअप अनुदानासाठी एचडीएफसी बँकेने केली स्टार्टअप इंडिया बरोबर भागीदारी*
India,२०२२- एचडीएफसी बँके कडून आज त्यांच्या सामाजिक स्टार्ट अप्स बरोबरच्या वार्षिक अनुदानाच्या सहाव्या पर्वासाठी त्यांनी भारत सरकारचा महत्त्वपूर्ण उपक्रम असलेल्या स्टार्ट अप इंडिया बरोबर भागीदारी केल्याची घोषणा केली. परिवर्तन स्टार्ट अप ग्रान्ट्स म्हणून नावाजलेल्या उपक्रमा अंतर्गत सामाजिक परिणाम घडवू शकणार्या संस्थांना ओळखून त्यांना त्यांच्या इन्क्युबेटर्सच्या माध्यमातून आर्थिक अनुदान दिले जाते.
हे अनुदान बँकेच्या सामाजिक उपक्रमासाठी असलेल्या परिवर्तन या ब्रॅन्ड अंतर्गत देण्यात येणार आहे. आजपर्यंत बँकेने ४५ इन्क्युबेटर्सच्या माध्यमातून ३० कोटी रुपयांचे अनुदान देऊन पर्यावरण, कृषी व्यवसाय, एड-टेक, वेस्ट मॅनेजमेंट, आरोग्यसेवा आणि कौशल्य विकास क्षेत्रात कार्यरत असलेल्या १६५ स्टार्ट अप्स ना सहकार्य केले आहे. बँके कडून स्टार्ट अप्सना बँकेच्या स्मार्टअप कार्यक्रमा अंतर्गत हे सहकार्य केले जात असून यांत विशेष बँकिंग आणि व्यावसायिकांना मुल्यावर्धित सेवांचा समावेश आहे. यामुळे स्टार्ट अप्स ना त्यांचे लक्ष्य पूर्ण करण्यास सहकार्य मिळून बँकेच्या प्रतिथयश आणि अत्याधुनिक अशा स्मार्ट फायनान्शियल टूल्स, ॲडव्हायझरी सर्व्हिसेस आणि तंत्रज्ञनानाचा ही लाभ मिळणार आहे.