*नव्याने सुरू करण्यात आलेल्या रिलायन्स हेल्थ इन्फिनिटी पॉलिसीमध्ये ₹5 कोटी पर्यंतची उच्च विमा रक्कम, वैद्यकीय उपकरणे, नियोजित जागतिक उपचार, प्रसूती संरक्षण आणि अनेक असंख्य फायदेनव्याने सुरू करण्यात आलेल्या रिलायन्स हेल्थ इन्फिनिटी पॉलिसीमध्ये ₹5 कोटी पर्यंतची उच्च विमा रक्कम, वैद्यकीय उपकरणे, नियोजित जागतिक उपचार, प्रसूती संरक्षण आणि अनेक असंख्य फायदे दिले आहेत*
भारतातील प्रथम क्रेडिट स्कोअर वर आधारित सवलती देऊ करून निरोगी आर्थिक स्थिती टिकवून ठेवल्याबद्दल ग्राहकांना पुरस्कृत करत आहे
मुंबई, 15 डिसेंबर 2022: भारतातील अग्रगण्य खाजगी जनरल इन्शुरन्स कंपन्यांपैकी एक असलेल्या रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (आर.जी.आय.सी.एल) ने आपल्या प्रकारचे पहिले प्रीमियम हेल्थ इन्शुरन्स उत्पादन म्हणजेच रिलायन्स हेल्थ इन्फिनिटी पॉलिसी लाँच केली आहे जी असंख्य लाभ देते. या असाधारण उत्पादनात ₹5 कोटी पर्यंतची उच्च विमा रक्कम, मोरग्लोबल संरक्षण (कव्हर), प्रसूती संरक्षण (मॅटर्निटी कव्हर), ओ.पी.डी संरक्षण (कव्हर), विमा रक्कमचे अमर्यादित पुनर्संचयन आणि 15 हून अधिक उपयुक्त अॅड-ऑन लाभ अशी उत्कृष्ट वैशिष्ट्ये भरपूर प्रमाणात आहेत. तसेच हे भारतातील पहिली क्रेडिट स्कोअर आधारित सवलत देऊन आणि प्रीमियमवर बी.एम.आय-आधारित सवलत देऊन आर्थिक व शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याबद्दल ग्राहकांना पुरस्कृत करत आहे. या श्रेणीतील सर्वांत उत्तम (टॉप-ऑफ-द-लाइन) उत्पादन लाँच केल्यासोबतंच, रिलायन्स जनरल इन्शुरन्सचे उद्दीष्ट आजच्या महत्वाकांक्षी, संपन्न किंवा उच्चभ्रू ग्राहकांच्या विकसनशील आणि विशिष्ट वैद्यकीय गरजा आणि प्राधान्यांकडे लक्ष देणे आहे जे जोखीम-विरोधी आणि जागरूक आहेत आणि ज्यांना जास्तीत जास्त संरक्षणासाठी त्यांच्या आरोग्य पॉलिसीमध्ये अनंत फायदे हवे आहेत.
रिलायन्स हेल्थ इन्फिनिटी पॉलिसीचे ‘मोर’ लाभांचे पर्याय – मोरग्लोबल, मोरकव्हर आणि मोरटाइम – ग्राहकांना कोणत्याही तडजोडीशिवाय आणि अडचणीशिवाय त्यांच्या आरोग्य विम्याच्या गरजा पूर्ण करू देतात. उदाहरणार्थ, जग फिरणाऱ्यांसाठी (ग्लोबट्रॉटर्ससाठी) योग्य असलेले मोरग्लोबल कव्हर, एअर अॅम्ब्युलन्स आणि ओ.पी.डी सुविधांसह परदेशात आपत्कालीन तसेच नियोजित वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देते. मोरकव्हर लाभ ग्राहकांना विम्याच्या रक्कम मध्ये 30% पर्यंत अतिरिक्त संरक्षण* जोडते ज्यामुळे एकूण संरक्षण वाढते. मोरटाइम लाभ फक्त 12 महिन्यांऐवजी* 13 महिन्यांच्या पॉलिसी कालावधीसह दीर्घ पॉलिसी कालावधी उपलब्ध करून देते.
या लाँचबद्दल रोमांचित झालेले रिलायन्स जनरल इन्शुरन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राकेश जैन म्हणाले की, “आज, मूलभूत आरोग्य योजना एखाद्याला आवश्यक असलेल्या संरक्षणाची खात्री करण्यासाठी पुरेशी नाही. जे लोक जोखीम-विरोधी आहेत आणि वाढत्या वैद्यकीय महागाई आणि आधुनिक उपचारांच्या उपलब्धतेबद्दल जागरूक आहेत, त्यांना अशा पॉलिसीची निवड करायची आहे जी अमर्यादित पुनर्संचयन, वैद्यकीय उपकरणांचे संरक्षण, नियोजित जागतिक उपचारांसह उच्च विम्याची रक्कम यासारख्या जागतिक दर्जाच्या फायद्यांसह असंख्य संरक्षण प्रदान करते. रिलायन्स हेल्थ इन्फिनिटी पॉलिसीच्या माध्यमातून आम्ही आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम दर्जाची वैशिष्ट्ये आणि ‘असंख्य फायदे’ देऊन त्यांचे संरक्षण जास्तीत जास्त वाढवण्यासाठी आणि ते पात्र आहेत अशी मनःशांती त्यांना मिळवून देण्यासाठी सक्षम बनवू इच्छितो.”