कळंगुट मध्ये संस्कार शिबिर उत्साहात संपन्न 🌹 🙏परम पूजनीय सद्गुरू माऊलींच्या कृपाशीर्वादाने🙏

.

🌹 कळंगुट मध्ये संस्कार शिबिर उत्साहात संपन्न 🌹
🙏परम पूजनीय सद्गुरू माऊलींच्या कृपाशीर्वादाने🙏

🌹श्री दत्त पद्मनाभ पीठ तपोभूमी 🌹संचालित , श्री स्वामी ब्रह्मानंद संस्कृत प्रबोधिनी संचालित
स्वामी ब्रह्मानंद संस्कृत पाठशाळा कळंगुट आयोजित
🌹🌹 संस्कार शिबिर 🌹🌹
श्री वठारी देवस्थान प्रभुवाडा कळंगुट
ह्या देवस्थानामध्ये , अत्यंत उत्साहात सुसंपन्न झाले.
सर्व प्रथम संप्रदायिक प्रार्थनेने शिबिरास सुरुवात झाली.
नंतर, प्रमुख अतिथींच्या हस्ते पू. सद्गुरू माऊलींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सर्व अतिथी नी दीपप्रज्वलन करण्यात आले,

लहान वयातच मुलांना योग्य संस्कार प्राप्त झाले तर भविष्यात तो बालक उत्तम सदाचारी नागरिक घडतो.
ह्यासाठी व पू.सद्गुरु माउलींना यंदाच्या मिळालेला 🙏 पद्मश्री 🙏 गौरव,
गोवा भोग भूमी नसुन खरोखरच योगभूमी आहे हे , सद्गुरू माऊलींच्या कार्यामुळे सर्वज्ञात झाले.
आणि भारत सरकारने ह्यांची दखल घेत अध्यात्मासाठीचा 🌹पद्मश्री 🌹पुरस्कार पू.सद्गुरु माऊलीना बहाल केला आहे,
सर्व गोमंतकीयाना अत्यंत अभिमानाची गोष्ट..
तसेच श्री दत्त पद्मनाभ पीठ तपोभूमीला यंदा (३०) वर्षे पूर्ण होत आहे, ह्याचेच औचित्य साधुन,
संपूर्ण गोव्यात ठिकठिकाणी संस्कार शिबिरे आयोजित करत आहे.
संत.समाज कळंगुट मध्ये
बालकांसाठी शिबीर अत्यंत उत्साहात सुसंपन्न झाले,
७५ जण शिबिरार्थ्यानी ह्याचा लाभ घेतला.
ह्या शिबिराला लाभलेला प्रमुख अतिथीगण,
ह्या वाड्याचे पंच ,
श्री प्रसाद अ. शिरोडकर

उत्तर गोवा महिला प्रमुख सौ. माही महे्श सिमेपुरूषकर,
कळंगुट युवा प्रमुख श्री सिद्दिक अंकुश गोवेकर

वठारी देवस्थानचे अध्यक्ष श्री प्रशांत देसाई,
कळंगुट संस्कृती पाठशाळेच्या आचार्या सौ.अवनी आकाश बाणावलीकर,
संत समाज कळंगुटचे अध्यक्ष श्री सुशांत मठकर,
कळंगुट क्षेत्राचे क्षेत्रिय प्रमुख सौ.अपर्णा लक्ष्मण लिंगुडकर व
श्री सरोज दिवकर,
संस्कृती पाठशाळेच्या प्रमुख सौ निवेदिता मठकर,
संत समाज कळंगुटचे प्रचारक श्री विष्णूभाऊ साळगावकर , असे
हे सर्व व्यासपीठावर अतिथी म्हणून उपस्थित होते,
संत समाज कळंगुटचे अध्यक्ष श्री सुशांत मठकर ने सर्व उपस्थितांचे शाब्दिक स्वागत केले,
कळंगुट झोनच्या क्षेत्रिय प्रमुख सौ
अपर्णा ल.लिंगुडकर ने , आजच्या
ह्या संस्कार शिबिराचा प्रमुख उद्देश ,
म्हणजे..यंदा…
पू.सद्गुरु माऊलींना केंद्रीय सरकारने
🌹अध्यात्मासाठी पद्मश्री🌹 ॲवोर्ड देऊन सन्मानित केलं..
जणू गोव्याची व्याख्याच बदलली की गोवा ही भोग भूमी नसून अध्यात्माची भूमी आहे… केंद्रीय सरकारने हे सहज जाहीर करुन टाकले.
सर्व गोवेकरांचाच हा सन्मान,
तसेच ,… श्री क्षेत्र तपोभूमी ला यंदा (३०) वर्षे पूर्ण होत आहेत ह्याचेच औचित्य साधून असे हे अनेक उपक्रम, संपूर्ण गोव्यात ठिकठिकाणी सुरू आहेत.

श्री दत्त पद्मनाभ पीठ तपोभूमी व पू.सद्गुरु श्री ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांचे , देश , विदेशातील कार्य सर्वांसमोर ठेवले,
तपोभूमी गुरुपीठावरील सर्व उपक्रम,
उदा.शांती व मानवतेच्या प्रचारार्थ आंतरराष्ट्रीय स्तरावर
International Sadguru Foundation,
गोवा विद्यापीठ संलग्न संस्कृत पदवीधर घडवण्याचे गोव्याचे एकमेव, स्वामी ब्रह्मानंद महाविद्यालय,
गोवा संस्कृत अकादमी, Bording School… International Gurukulam,
योग गुरुकुल,
बुद्धिमान , संस्कारी विद्यार्थ्यांसाठी सर्वमान्य सद्गुरू ज्ञानपीठ कार्यरत आहे,
स्वामी ब्रह्मानंद संस्कृत प्रबोधिनी संचालित ४३ संस्कृत पाठशाळा गावोगावी सुरू आहेत.
ह्या ४३ शाळांमधून आपल्या पाठशाळेला २०१८ साल चा 🌹 आदर्श पाठशाळा 🌹
व आपल्या शाळेच्या आचार्या सौ अवनी बाणावलिकरना आदर्श शिक्षिका हा पुरस्कार प्राप्त झाला.
कळंगुटकराना अभिनंदनीय असा हा अद्वितीय पुरस्कार ..

श्री दत्त पद्मनाभ पीठ तपोभूमी हे गोमंतकाचे ह्र्द्य पीठ,. सर्व गोमंतकीयाना आपले वाटावे असे,
पूजनीय सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांच्या दिव्य मार्गदर्शनाने देव, देश,धर्मकार्य पूढे पूढे जात , आहे.. सर्व मनुष्य जातीने आपले जीवन आनंदमय बनवण्यासाठी संतांची संगत धरावी,
असे विचार क्षेत्रिय प्रमुखांनी ह्या समयी सर्वांसमोर मांडले.

प्रमुख पाहुणे श्री प्रसाद शिरोडकर ने आपले सुंदर विचारांचे मनोगत व्यक्त केले.
ह्या शिबिराचे संपूर्ण निवेदन श्री लक्ष्मण लिंगुडकर ह्यांनी केले.
संत समाज कळंगुट चे सचिव श्री उदय गडेकर यांनी आभार प्रदर्शन केले.
सकाळी १०.००वा शिबिर प्रारंभ झाले.
दुपारी भोजन कृती , शिबिरार्थिना शिकवून करवून घेतली.
संध्याकाळी ५.३० वा
जन्मदिवस सादरीकरण करून पसायदानाने शिबिर सांगता करण्यात आली
🙏🙏जय सच्चिदानंद

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar