जीएफडीसी कार्यालयात नाताळ साजरा
पणजी :गोवा फुटबॉल विकास परिषदेने (जीएफडीसी) पणजी येथील आपल्या कार्यालयात नाताळ दिवस साजरा केला.
नाताळनिमित्त खास वेश परिधान करून सर्व कर्मचाऱ्यांनी विविध स्पर्धा व मनोरंजनात्मक उपक्रमांमध्ये सहभाग नोंदविला.
कोविड १९ मुळे तब्बल दोन वर्षांच्या अंतराने हा सोहळा झाला. कर्मचाऱ्यांनी यावेळी भेटवस्तूंचे आदान प्रदान केले. ख्रिसमस ट्री जवळ कॅरोल गायन करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
नाताळ हा शांती व सद्भाववृध्दिंगत करण्याचा दिवस आहे. आयुष्य साजरे करून अपेक्षा जागृतीचा दिवस आहे. हा आनंदाचा मोसम तुम्हाला प्रेम, आनंद, भरभराट देवो, असे जीएफडीसी अध्यक्ष ब्रह्मानंद शंखवाळकर यांनी सांगितले.
जीएफडीसी सदस्य सचिव दिपेश प्रियोळकर यांनी सांगितले की, नाताळ सण ही आपल्यामधील नाते घट्ट करून कुटुंब, समाज, देश म्हणून एकत्र येण्याची संधी आहे. आम्ही शांतीचे दूत बनून सर्वांना सुयश चिंतूया.