क्रोमा भारतातील सर्वात मोठ्या म्युझिक फेस्टिवल सनबर्न २०२२ चे ऑफिशियल इलेक्ट्रॉनिक्स पार्टनर बनले!

.

क्रोमा भारतातील सर्वात मोठ्या म्युझिक फेस्टिवल सनबर्न २०२२ चे ऑफिशियल इलेक्ट्रॉनिक्स पार्टनर बनले!
~ रोमांचक उपक्रम, इंस्टॉलेशन्ससह, इलेक्ट्रॉनिक ऑफरिंग्सच्या वैविध्यपूर्ण श्रेणीसह क्रोमा या म्युझिक फेस्टिवलचा आनंद द्विगुणित करेल
~ पर्यावरण सुरक्षा आणि ई-वेस्टची विल्हेवाट याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी क्रोमाने एक अनोखे इन्स्टॉलेशन तयार केले आहे, जे प्रत्येक व्यक्तीला विचार करायला प्रवृत्त करते, हे इन्स्टॉलेशन ई-वेस्ट आणि ग्रीन गार्डनिंग सामग्रीपासून तयार करण्यात आले आहे.
~ फेस्टिवलच्या ठिकाणी क्रोमाने चार्जिंग स्टेशन्स देखील उभारली आहेत.
~ क्रोमा गेम झोनमध्ये भाग्यशाली विजेता जिंकू शकतील टीव्ही, रेफ्रिजरेटर, मायक्रोवेव आणि स्पीकर्ससारखी आकर्षक बक्षिसे

गोवा, डिसेंबर २०२२: भारतातील पहिले आणि सर्वात विश्वसनीय ओम्नी-चॅनेल इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर व टाटा समूहातील एक सदस्य क्रोमाने एक सर्वात मोठा म्युझिक फेस्टिवल सनबर्नसोबत त्यांचे ऑफिशियल इलेक्ट्रॉनिक्स पार्टनर म्हणून भागीदारी केली आहे. गोव्यात २८ ते ३० डिसेंबर २०२२ पर्यंत या फेस्टिवलचे आयोजन केले जाणार आहे. क्रोमा हा आपल्या ग्राहकांना सर्वाधिक प्राधान्य देणारा आणि त्यांना सर्वोत्तम उत्पादने व सेवासुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्नशील असलेला ब्रँड म्हणून ओळखला जातो. जेन एक्स, वाय आणि झेड यांचा सर्वाधिक पसंतीचा व त्यांच्या सर्वाधिक विश्वासाचा इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड बनणे हे या भागीदारीचे उद्दिष्ट आहे. या फेस्टिवलमधील ९५% टीजी जेन झेड आणि मिलेनियल्स आहेत, त्यांच्यासोबत आपले नाते अधिक गहिरे व्हावे या उद्देशाने क्रोमाने हे पाऊल उचलले आहे.

सनबर्न हा आशियामधील प्रीमियर ईडीएम फेस्टिवल आहे आणि जगभरातील सर्वात मोठ्या म्युझिक फेस्टिवल्समध्ये याला स्थान देण्यात आले आहे. फेस्टिवलचे ऑफिशियल इलेक्ट्रॉनिक्स पार्टनर म्हणून क्रोमाने आपल्या रिसोर्सेसची विशाल श्रेणी फेस्टिवलच्या ठिकाणी गॅजेट्सवर आणली आहे. तंत्रज्ञान आणि भविष्य हा यंदाच्या वर्षीचा विषय असल्याने फेस्टिवलमध्ये क्रोमाचा सहभाग हा एक उत्तम योग जुळून आला आहे. पर्यावरण सुरक्षा आणि ई-वेस्टची विल्हेवाट याविषयी जागरूकता वाढवण्यासाठी क्रोमाने एक अनोखे इन्स्टॉलेशन तयार केले आहे, जे ई-वेस्ट आणि ग्रीन गार्डनिंग सामग्रीपासून बनवले आहे. तंत्रज्ञान आणि निसर्ग यांच्यातील संतुलन, या दोघांचे एकत्र मिळून पर्यावरण सुरक्षेच्या दिशेने पुढे जाणे याठिकाणी दर्शवण्यात आले आहे. इलेक्ट्रॉनिक्स वेस्टची विल्हेवाट लावताना येणाऱ्या समस्या पाहता आणि ई-वेस्टवर जागरूकता निर्माण करण्यासाठी पहिल्यांदा हा उपक्रम चालवला जात आहे.

तीन दिवसांच्या या फेस्टिवलला भेट देणाऱ्यांच्या सुविधेसाठी क्रोमाने स्टेडियमच्या चारी बाजूंना स्पेशलाइज्ड चार्जिंग स्टेशन्स लावली आहेत, फेस्टिवलमध्ये येणारे लोक याठिकाणी चार्जिंगची सुविधा घेऊ शकतील आणि फेस्टिवलच्या सर्व आठवणी फोटो व व्हिडिओच्या रूपाने कायम आपल्यासोबत ठेऊ शकतील. हे करत असताना त्यांना चार्जिंगची चिंता अजिबात करावी लागणार नाही.

क्रोमाने एक भलामोठा बूमबॉक्स लावला आहे, जो याठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला थिरकायला भाग पाडेल. या बूमबॉक्समुळे फेस्टिवलच्या ठिकाणाचे रूप पार बदलून जाईल, हा बूमबॉक्स सनबर्नची डायनॅमिक संस्कृती दर्शवतो आणि संगीतप्रेमींसाठी हा एक अतुलनीय अनुभव ठरेल. आयुष्यभर सोबत राहतील अशा आठवणींसाठी आफ्टर-पार्टी क्लिक्स, सोशल मीडिया पोस्ट्स व सेल्फीजसाठी हा एक फोटो बूथ आहे. क्रोमा प्ले एरिया, बॉल पूलमध्ये भाग घेऊन टीव्ही, फ्रिज, मायक्रोवेव आणि पार्टी स्पीकर्ससारखी आकर्षक बक्षिसे जिंकता येतील. क्रोमाने गिफ्ट व्हाउचर्स आणि सनबर्न प्रोटेक्टिव्ह किट अशा भेटवस्तू देखील ठेवल्या आहेत.

क्रोमा-इन्फिनिटी रिटेल लिमिटेडचे चीफ बिझनेस ऑफिसर (ईकॉमर्स अँड मार्केटिंग) श्री. शिबासाहिश रॉय यांनी सांगितले, “भारतीय ग्राहकांना उत्तमोत्तम भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या संगीताचा आस्वाद घेता यावा यासाठी सनबर्नसोबत सहयोग करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. संगीताचे अनेक प्रकार आहेत आणि त्या सर्व प्रकारांसह संगीत जगभरात पसंत केले जाते. अशा प्रकारच्या भागीदारींसह आम्ही आमची वचनबद्धता मजबूत करत आहोत आणि आमच्या ग्राहकांना त्यांची आवडनिवड पूर्ण करण्याचा आनंद घेण्याची संधी प्रदान करत आहोत.”

सनबर्नचे सीईओ श्री. करण सिंह यांनी सांगितले, “देशातील एक अग्रेसर आणि विश्वसनीय इलेक्ट्रॉनिक्स शॉपिंग डेस्टिनेशन क्रोमासोबत हातमिळवणी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील त्यांची नैपुण्ये आणि नावीन्यपूर्णतेबद्दलची वचनबद्धता यांनी प्रभावित होऊन आम्ही क्रोमाला आमचे सर्वोत्कृष्ट भागीदार म्हणून निवडले आहे. आम्हाला खात्री आहे की ही भागीदारी याठिकाणी येणाऱ्या संगीतप्रेमींना असे अनोखे अनुभव प्रदान करेल जे त्यांना आयुष्यभर स्वतःसोबत जपून ठेवावेसे वाटतील.”

क्रोमाचा सनबर्नसोबत सहयोग गोव्याचे लोक, गोव्याचा वारसा यांच्याबद्दल क्रोमाला वाटणाऱ्या आदर व सन्मानाचे प्रतीक आहे. संगीत, भोजन, फॅशन आणि खेळ यांचा उत्तम मिलाप घडवून आणून, स्थानिक पाककला व संस्कृती यांचा अनुभव घेण्याची संधी क्रोमाने आपल्या अनोख्या ऑन-ग्राउंड ऑफरिंग्समधून दिली आहे.

प्रीमियर लाईव्ह म्युझिक इव्हेन्ट सनबर्न बाय क्रोमामध्ये संगीतविश्वातील काही प्रतिष्ठित कलाकार सहभागी होत आहेत. यामध्ये ७ स्टेजेसमध्ये १२० पेक्षा जास्त इंटरनॅशनल आणि भारतीय ऍक्ट प्रस्तुत केले जातील, स्वीडिश हाऊस माफिया, मार्टिन गॅरिक्स, टेस्टो, अविकी, हार्डवेल, डेडमौ५ आणि मार्शमेलो यासारखे मॅसिव्ह हेडलायनर्स यामध्ये सहभागी होत आहेत. या भागीदारीमुळे दोन दिग्गज ब्रँड्स आपली कौशल्ये आणि क्षमता यांना एकत्र आणून गोव्यामध्ये संगीतप्रेमींसाठी एक संस्मरणीय सांगीतिक अनुभव निर्माण करतील.

About Croma-Infiniti Retail Ltd.
Launched in 2006, Croma was the first one-of-its kind large format specialist retail store that catered to all multi-brand digital gadgets and home electronic needs in India. Bringing alive the promise of a ‘Brighter Every Day’ for its customers, Croma offers its customers a world-class ambience and omnichannel customer experience to shop both in-store and online at www.croma.com.
With over 16,000 products across 550+ brands through 300+ stores across 100+ major cities of India, Croma ensures that for each customer, a Brighter Tomorrow begins Today! Croma is a brand of Infiniti Retail Ltd., which is a part of the Tata Group.

Croma-Infiniti Retail Ltd.
Sanyukta Lal
Corporate Communications Manager
9820792571 / sanyukta.lal@croma.com

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar