सेवाव्रती देवदूत ‘दोतोर विश्वास’ यांचा सत्कार !

.

सेवाव्रती देवदूत ‘दोतोर विश्वास’ यांचा सत्कार !

पेडणे :
पेडणे तालुक्यातील ज्येष्ठ समाजसेवक तथा समाजसेवेतील देवदूत म्हणून सुपरिचित असलेले विश्वास पालयेकर यांचा कडशी मोपा येथील स्वामी विवेकानंद संस्थेतर्फे आज सत्कार करण्यात आला. चार दशके व्रतस्तगपणे समाजसेवा बजावताना गोवा तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो कुटुंबाना पालयेकर यांनी मदतीचा हात दिला असून त्यांच्या या कार्याची दखल घेत विवेकानंद संस्थेने विश्वास पालयेकर यांचा त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थित सत्कार केला.

गोवा राज्य शिक्षण खात्याचे निवृत्त सहाय्यक संचालक ईश्वर पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन विश्वास पालयेकर यांना गौरविण्यात आले. यावेळी सौ पालयेकर, त्यांचा मुलगा वैभव पालयेकर, शिक्षक वसंत कोळंबकर, अमोल आसोलकर व भावार्थ मांद्रेकर उपस्थित होते.

सन्मानाला उत्तर देताना पालयेकर म्हणाले की, शिक्षक म्हणून काम करताना आपल्या वडीलांनी त्यांचे विद्यार्थी व परिसरातील अनेक लोकांचे जीवन घडवले. वाडीलांचाच वारसा आपण जपला असून समाजकार्यात गोवा व शेजारील राज्यातील असंख्य कुटुंबात आपण परिचित होऊ शकलो त्यांना मदत करायची आपणास संधी मिळाली.

समाज कार्य करताना दिवस रात्रीची तमा न बाळगता आपण काम करू शकलो ते आपली पत्नी सौ.भीमा हिची यथार्थ साथ मिळाल्यानेच होय असेही पालयेकर यांनी पुढे म्हटले.

समाजाचा उत्कर्ष साधणे हे समाजात राहणाऱ्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता आपण समाजाचे ऋण फेडीत जावे. समाजसेवेचे मूल्य हेच सर्वश्रेष्ठ मुल्य असून पालकांनी आपल्या मुलांवर समाजसेवेचे योग्य संस्कार करून भावी पिढीला संस्कारक्षम बनवावे असा संदेश पालयेकर यांनी यावेळी दिला.

फोटो
पेडणे येथे ज्येष्ठ समाजसेवक विश्वास पालयेकर यांचा सत्कार करताना शिक्षण खात्याचे निवृत्त सहाय्यक संचालक ईश्वर पाटील, सोबत सौ पालयेकर, अमोल आसोलकर, वसंत कोळंबकर व अन्य.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar