किंबर्ली-क्लार्कने आपला प्रसिद्ध डायपर ब्रँड हगीज नव्या “हगीज कम्प्लीट कम्फर्ट®” श्रेणीसह भारतात पुन्हा लॉन्च केला

.

किंबर्ली-क्लार्कने आपला प्रसिद्ध डायपर ब्रँड हगीज नव्या “हगीज कम्प्लीट कम्फर्ट®” श्रेणीसह भारतात पुन्हा लॉन्च केला.
~रीलॉन्चमध्ये ब्रँड आपल्या सर्व टचपॉइंट्सना सादर करत आहे आपली संपूर्णपणे नवी व्हिज्युअल ओळख, त्याबरोबरीनेच डायपरचे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण एकामध्ये पाच आराम हे वचन देखील अधोरेखित केले जात आहे. ~

राष्ट्रीय, 3 जानेवारी 2023: किंबर्ली क्लार्कने भारतात हगीज कम्प्लीट कम्फर्ट® पुन्हा लॉन्च करत आपल्या लोकप्रिय ब्रँड हगीजची संपूर्णतः नवी ओळख देखील प्रस्तुत केली आहे. ग्राहकांची आवड आणि त्यांच्या गरजा याबाबत करण्यात आलेल्या एका सखोल संशोधनाच्या आधारे पुन्हा लॉन्च करण्यात आलेल्या श्रेणीमध्ये ब्रँडने एकामध्ये पाच आराम या आपल्या प्रमुख वचनावर लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये मुलायमपणा आणि शोषून घेण्याची क्षमता यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. ब्रँडची प्रमुख वैशिष्ट्ये आणि त्यापासून ग्राहकांना मिळणाऱ्या लाभांना अधोरेखित करणाऱ्या संपूर्ण श्रेणीमध्ये आपल्या पॅकेजिंग डिझाईनमार्फत हा ब्रँड पूर्णपणे नवी व्हिज्युअल भाषा स्वीकारत आहे.

रीलॉन्चच्या प्रसंगी हगीजने आपले नवे कॅम्पेन “वी गॉट यू, बेबी” देखील सुरु केले आहे, यामध्ये ब्रँडने लहान मुलांसाठी हे जग अजून जास्त आरामदायी बनवण्याचे वचन दिले आहे. लॉन्च फिल्मची संकल्पना ऑगिल्व्ही इंडियाची आहे. डायपरमुळे बाळांना होणारी असुविधा आणि त्रास दर्शवण्यासाठी एक क्रिएटिव्ह डिव्हाईस म्हणून फिल्ममध्ये बाळाच्या आवाजाचा उपयोग करण्यात आला आहे. डायपरमुळे होणाऱ्या त्रासापासून बाळांची सुटका करण्यासाठी आले आहे हगीज, जे बाळांना मिळवून देते एका डायपरमध्ये पाच आराम – बबल बेड कोमलता, १२ तासांपर्यंत शोषून घेत राहण्याची क्षमता, ट्रिपल लीक गार्ड, हवा खेळती राहील असे मटेरियल आणि आरामदायी फिट वेस्टबॅन्ड.

किंबर्ली क्लार्क इंडियाच्या मार्केटिंग डायरेक्टर श्रीमती साक्षी वर्मा मेनन यांनी रिलॉन्चच्या वेळी सांगितले, “हगीज असा ब्रँड आहे जो बाळांसाठी हे जग अधिक जास्त आरामदायी बनवण्यासाठी सातत्याने नवनवीन प्रयत्न करत असतो. सखोल ग्राहक संशोधनात आम्हाला असे आढळून आले की, एकाच उत्पादनातून अनेक वेगवेगळे लाभ आणि संपूर्ण आराम मिळणे बाळांसाठी आवश्यक आहे. ‘हगीज कम्प्लीट कम्फर्ट’ ही आमची नवी श्रेणी आमच्या भारतीय ग्राहकांसाठी सादर करताना आम्हाला खूप अभिमान वाटत आहे कारण या श्रेणीतून आम्ही बाळांसाठी व त्यांच्या आईवडिलांसाठी पालनपोषणाची बिकट वाटचाल सोपी आणि आनंददायी बनवत आहोत. आमच्या संशोधनात आढळून आले की, १० पैकी ९ माता असे मानतात की त्यांच्या नियमित डायपरपेक्षा हगीज जास्त आरामदायी आहे, आमच्या आदर्श आणि प्रसिद्ध ब्रँडवर ग्राहकांचा विश्वास किती मजबूत आहे ते यातून पुन्हा एकदा दिसून आले आहे.”

कॅम्पेनबद्दल त्यांनी पुढे सांगितले, “आजच्या काळातील आई आपला सर्वाधिक वेळ ज्या-ज्या प्लॅटफॉर्म्सवर व्यतीत करते अशा सर्व प्लॅटफॉर्म्सवर आम्ही एक डिजिटल फर्स्ट कॅम्पेन सुरु केले आहे. कॅम्पेनमधील कन्टेन्ट आम्ही खूपच वैयक्तिक स्वरूपाचा ठेवला आहे. ग्राहकांना हे कॅम्पेन पूर्णपणे आपलेसे वाटावे आणि ब्रँडसोबत त्यांचे नाते अधिक घनिष्ठ व्हावे यासाठी, विशेष ग्राहकवर्गावर लक्ष केंद्रित करत आम्ही हे कॅम्पेन तयार केले आहे.

भारतातील एक चॅलेंजर ब्रँड म्हणून अव्यवस्था आणि असुविधा यांना दूर सारून, ग्राहकांचा पसंतीचा ब्रँड म्हणून स्थान कायम करणे आमच्यासाठी अत्यावश्यक आहे. आमचे क्रिएटिव्ह पार्टनर ऑगिल्व्ही यांनी आमचा संदेश ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा खूपच मनोरंजक आणि अनोखा मार्ग शोधून काढला आहे आणि आम्हाला पक्की खात्री आहे की हे कॅम्पेन ग्राहकांच्या मनात आमचे स्थान अजून जास्त मजबूत करेल.”

ऑगिल्व्ही इंडियाचे चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर श्री. सुकेश कुमार नायक या फिल्मबद्दल म्हणाले, “हगीजसाठी आमच्या नव्या कॅम्पेनमध्ये लहान बाळे आपल्या समस्यांकडे आईवडिलांचे लक्ष आकर्षित करून घेण्यासाठी अर्धवट डायपरचा बहिष्कार करत आहेत, डायपर अर्धवट अशासाठी कारण ते बाळांना संपूर्ण आराम देऊ शकत नाहीत. असुविधा आणि असंतोष यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या या बाळांना असे डायपर हवेत ज्यामुळे त्यांना फक्त सुकेपणाच नव्हे तर, संपूर्ण आराम देखील मिळेल. हगीज आहे बाळांचा खरा मित्र, जो त्यांच्या गरजा न बोलता देखील समजून घेतो, बाळांना होणारा त्रास त्यांच्या आईवडिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि बाळांची मदत करण्यासाठी हगीज घेऊन आला आहे एक संदेश जो आम्ही खूपच मनोरंजक व प्रभावी पद्धतीने मांडला आहे. बाळांची सुविधा आणि मदतीसाठी हगीज सादर करत आहे नवे हगीज कम्प्लीट कम्फर्ट डायपर्स, हे डायपर वापरताना बाळांना अर्धवट आरामाशी तडजोड करावी लागणार नाही.”

हगीज कम्प्लीट कम्फर्ट® श्रेणी सर्व ऑफलाईन स्टोर्स आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहे.

फिल्म पाहण्यासाठी लिंक: https://www.youtube.com/watch?v=t2WSvh54Frs

About Huggies:
From the house of Kimberly-Clark, Huggies has been helping parents provide love, care and comfort to their babies, for more than 25 years. From creating innovative everyday products, to strong hospital programs, to partnering with real mothers to develop diapers and wipes, Huggies promises to ensure all babies get the care they need to thrive. For more information on Huggies India, please visit https://www.huggies.co.in/en-in/

For more information, please contact:
Preeti Binoy
Head – Corporate Communications and Government Affairs (India)

Tel: +91-22-3322 0027 | +91-9769137505
Email: preeti.binoy@kcc.com

Azka Shaikh
Adfactors PR

Tel: +91 9920120645
Email: azka.shaikh@adfactorspr.com

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar