हिंदु रक्षा महाआघाडीच्या वतीने ८ जानेवारीला वेर्णा येथे संस्कार प्रशिक्षण कार्यशाळा

.

 

*हिंदु रक्षा महाआघाडीच्या वतीने ८ जानेवारीला वेर्णा येथे संस्कार प्रशिक्षण कार्यशाळा*
पणजी, ४ जानेवारी – हिंदु रक्षा महाआघाडीच्या वतीने रविवार, ८ जानेवारी या दिवशी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत वेर्णा येथील श्री महालसा नारायणी मंदिर सभागृह येथे संस्कार प्रशिक्षण कार्यशाळा घेतली जाणार आहे.
या कार्यशाळेत पालक आणि बालक या दोघांनाही उपयुक्त असे मार्गदर्शन केले जाणार आहे. कार्यशाळेत श्लोक, प्रार्थना, भक्ति गीते, स्फूर्ति गीते, आदर्श व्यक्तिमत्त्व, विविध पारंपारिक खेळ , पारंपारिक गीते, बोधकथा, दिनचर्या, आरोग्य विषयक माहिती, भारतीय परंपरा, सणवार आदींविषयी बहुमूल्य असे मार्गदर्शन केले जाणार आहे. ही कार्यशाळा निःशुल्क असून या कार्यशाळेत वय १५ वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेले सहभागी होऊ शकतात. आपल्या मुलांवर चांगले संस्कार होण्याच्या उद्देशाने हिंदु संघटनांनी संघटित होऊन हिंदु रक्षा महाआघाडीच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. अधिकाधिक बंधु भगिनींनी यामध्ये सहभागी होऊन या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन हिंदु रक्षा महाआघाडीच्या वतीने करण्यात आले आहे. इच्छुकांनी नाव नोंदणी किंवा इतर माहिती यांसाठी ९८२३७६९११५/ ७७७४०८१४४१/ ९४२३८२०५७१ या ठिकाणी संपर्क करावा. सकाळी न्याहारी आणि दुपारी जेवणाची सोय करण्यात आली आहे याची नोंद कार्यशाळेत सहभागी होणार्‍यांनी घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

आपला विश्वासू,
हिंदू रक्षा महाआघाडी
9423307278

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar