इंडिगो तर्फे उत्तर गोव्यातील नवीन गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट, मोपा येथून उड्डाणांच्या सुरुवातीची घोषणा*

.

*इंडिगो तर्फे उत्तर गोव्यातील नवीन गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट, मोपा येथून उड्डाणांच्या सुरुवातीची घोषणा*

*राष्ट्रीय, ५ जानेवारी २०२३-* आपले स्थानीय नेटवर्क अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने इंडिगो या भारतातील आघाडीच्या कॅरियर ने आज नवीन गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट (मोपा, उत्तर गोवा) येथून उड्डाणांची सुरुवात केल्याची घोषणा केली.

या उड्डाणांची सुरुवात आज पासून करण्यात आली असून हैद्राबाद आणि गोवा या दरम्यान चे हे पहिले उड्डाण होते. या उड्डाणामुळे त्यांच्या ६ई नेटवर्क मधील ७६ वे स्थानिक तर एकूण १०२ वे स्थान ठरले आहे.

इंडिगो कडून मोपा विमानतळावरुन पहिल्या दिवसापासूनच आठवड्याला १६८ उड्डाणे होणार असून मोपा हून ८ स्थानिक स्थळांमध्ये हैद्राबाद, दिल्ली, मुंबई, बंगलोर, चेन्नई, पुणे, जयपूर आणि अहमदाबाद यांचा समावेश आहे.

नवीन नेटवर्क मुळे गोव्याची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन त्यांची मागणी पूर्ण होणार असून त्याच बरोबर गोवा हे पर्यटकांचे आवडते स्थळ असल्यामुळे आता ग्राहकांना नवीन पर्याय उपलब्ध होऊन प्रवासही अधिक परवडणार आणि उत्तर गोव्याच्या प्रगतीसाठी परिणामकारक ठरु शकेल.

सध्या दक्षिण गोव्यात कार्यरत असलेल्या गोवा दाबोलिम विमानतळ कार्यरत राहणार असून इंडिगो कडून तिकडे सुरु असलेले सध्याचे कार्य सुरुच राहणार आहे.

या प्रसंगी बोलतांना इंडिगो चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पीटर एल्बर्स यांनी सांगितले “ आमच्या सर्वांत मोठ्या नवीन स्टेशन असलेल्या उत्तर गोव्यातील मोपा येथील नवीन गोवा इंटरनॅशनल एअररपोर्ट वरुन कामकाज सुरु करतांना आंम्हाला आनंद होत आहे. अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणावर काम सुरु करणे ही इंडिगो साठी आनंदाची गोष्ट आहे आणि यातून आमची महत्त्वाकांक्षा आणि जोडणी करण्यातील प्रगती, सहज उपलब्धता यांमुळे प्रवाश्यांना देशातील सर्वाधिक प्रमाणावर येणार्‍या पर्यटनस्थळांपैकी एक असलेल्या स्थानाला भेट देणार्‍यांना सहज जोडणी उपलब्ध करुन देत आहोत. परवडणारे दर, वेळेतील कार्यक्षमता, नम्र आणि सोपी सेवा, जोडणी ही लोकांच्या आवडीच्या ठिकाणी देण्याच्या आमच्या वचनावर ठाम राहण्यास कटिबध्द आहोत.”

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११डिसेंबर २०२२ रोजी गोव्यातील दुसर्‍या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन उत्तर गोव्यातील मोपा येथे करण्यात आले.

प्रवश्यांच्या आवडीचे हे स्थान असून यामुळे पर्यटकांना जवळवपासच्या पर्यटनस्थळांना पोहोचणे सोपे जाईल, यामध्ये चापोरा फोर्ट, वगाटोर बीच, अंजुना बीच, फोर्ट आगौडा, बागा बीच, कांडोलीम बीच, कलंगुट बीच, सिंक्वेरियम बीच, रेईस मागोस फोर्ट, बेसिलिका ऑफ बॉम जीजस, दी चर्च ऑफ अवर लेडी ऑफ इमॅक्युलेट कन्सेप्शन आणि अन्य ठिकाणांचा समावेश आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकची सीमा जवळ असल्यामुळे प्रवासाची आवड असणार्‍या लोकांना जवळपासच्या ठिकाणी जाणे शक्य होणार आहे यांत अंबोली, गोकर्ण, दूधसागर धबधबा, तारकर्ली, जोगा वॉटरफॉल्स, दांडेली, खुदरमुख, देवबाग, पांचगणी, मुरुडेश्वर, मालवण, गणपतीपुळे आणि कोल्हापूर यांचा समावेश आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar