विकासाच्या दृष्टीने पुढे जाताना मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट हा कार्यान्वयीत झाला असून विमानांची ये जा सुरू झाली आहे, श्री देव बोडगेश्वराच्या कृपेने यापुढे अशीच मोठ मोठी विकास कामे होत राहतील. सुमारे दोन वर्षाच्या कालखंडानंतर श्री देव बोडगेश्वराची जत्रा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे, या जत्रेनिमित्त समस्त भक्तगणांना आपण शुभेच्छा देत आहोत असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी श्री देव बोडगेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी श्री देव बोडगेश्वराच्या जत्रे निमित्त श्री देव बोडगेश्वराचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला, यावेळी त्यांच्यासोबत उपसभापती तथा म्हापसाचे आमदार जोशुवा डिसोझा, कळंगुटचे आमदार तथा माजी मंत्री मायकल लोबो, शिवोलीच्या आमदार डीलायला लोबो, म्हापसा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर व इतर नगरसेवक उपस्थित होते.
विकासाच्या दृष्टीने पुढे जाताना मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट हा कार्यान्वयीत झाला असून विमानांची ये जा
.
[ays_slider id=1]