गणेशपुरी, म्हापसा येथील ‘विद्या भारती,गोवा’ संचालित श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालयाच्या हेल्थ केअर व रिटेल या राष्ट्रीय कौशल्य व उद्योजकता विभागांतर्गत

.

गणेशपुरी, म्हापसा येथील ‘विद्या भारती,गोवा’ संचालित श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालयाच्या हेल्थ केअर व रिटेल या राष्ट्रीय कौशल्य व उद्योजकता विभागांतर्गत विषयांच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच पेडणे तालुक्यातील भाईडवाडा,कोरगांव येथील प्रगतशील शेतकरी उदय प्रभूदेसाई यांच्या जयदत्त अॅग्रो फार्मला भेट देऊन तिथल्या उत्पादनांची व आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेतली.
उदय प्रभूदेसाई यानी फार्ममधील शेती, फळबाग, फुलबाग व कुक्कुटपालन या सर्व विभागांविषयी, तसेच तिथे वापरण्यात येणाऱ्या नैसर्गिक जलसिंचन पद्धतीची व वीज,पाणी तथा कामगार या महत्त्वाच्या घटकांची बचत करणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाची विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.फार्ममधील विविध जातींचे नारळ, विविध प्रकारचे तांदूळ, स्वयंपाकघरात वापरण्यात येणाऱ्या पदार्थ्यांची बाग,तसेच सेंद्रीय पद्धतीच्या गुळाची निर्मिती प्रक्रिया या संदर्भातही त्यानी माहिती दिली.
आचार्य डॉ.अक्षया भगत, सोनिया बर्वे व प्रशिक्षणार्थी आचार्य उन्नती तोरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही अभ्यास भेट संपन्न झाली.
(छायाचित्र:- जयदत्त अॅग्रो फार्ममध्ये अभ्यास भेटीवर गेलेले गणेशपुरी, म्हापसा येथील श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी आचार्य व उदय प्रभूदेसाई यांच्या समवेत.)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar