नॅशनल योगासना स्पोर्ट्स फेडरेशन तर्फे तिसरी राष्ट्रीय योगासन स्पर्धा संगमनेर महाराष्ट्र येथे आयोजित

.

नॅशनल योगासना स्पोर्ट्स फेडरेशन तर्फे तिसरी राष्ट्रीय योगासन स्पर्धा संगमनेर महाराष्ट्र येथे आयोजित करण्यात आली होती .ही स्पर्धा 27 ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये घेण्यात आली. या स्पर्धेसाठी गोव्यातून अकरा मुले आणि 14 मुली अशा 25 मुलांनी भाग घेतला होता. गोव्याच्या या पंचवीस मुलांची पहिल्या दहा संघामध्ये निवड झाली .या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये गोव्या च्या मुलांनी पाच रौप्य पदके पटकावली. आर्टिस्टिक सिंगल मुले रौप्य पदक -विद्याथ लोटलीकर ,रिधिमिक पेयर मुली रौप्य पदक याशिका चेवली आणि मनस्वी दास ,आर्टिस्टिक पेअर मुले आरिफ खान आणि आरुष गावकर ,सब जूनियर आर्टिस्टिक ग्रुप मुले -रोप्य पदक -आरिफ खान ,आरुष गावकर ,गणेश रामदुर्ग, यश शिरोडकर आणि शौनक बाराजणकर. जूनियर आर्टिस्टिक ग्रुप मुली -लक्ष्मी इलकल, नंदिनी धीमान ,अश्विनी चुरी ,दीपाली ननावरे आणि साईशा फुलारी . या मुलांचे योगासना स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ गोवा यांच्यावतीने सत्कार करण्यात आला . तसेच त्या मुलांना प्रशिक्षण देणारे शिक्षक विशाल गावस आणि दामोदर गावेकर संघाच्या मॅनेजर सुलोचना बाराजणकर, सुनीता नाईक आणि ज्योती माल्या यांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम मापसा येथे सिद्धार्थ हॉल येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राघव शेट्टी -हॉटेल आनंद सागरचे प्रोप्रायटर, मीना नाईक -सीएसबी बँक मॅनेजर ,तुलसीदास मंगेशकर पतंजली किसान सेवा योग समितीचे अध्यक्ष, संदेश बारजणकर वायएसएजी जनरल सेक्रेटरी, डॉक्टर नामदेव चोपडेकर ,संध्या खानोलकर महिला पतंजली योग समितीच्या अध्यक्षा यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला .डॉक्टर नामदेव चोपडेकर यांनी सांगितले आत्ताच्या काळात शारीरिक ,मानसिक ,अध्यात्मिक यांची एकसंधता असणे गरजेचे आहे. योगाच्या माध्यमातून या मुलांनी ही एकसंधता साधता येत आहे .राघव शेट्टी यांनी मुलांना योगाचे महत्व सांगितले .योग हा खेळ प्रकारात आल्यापासून मुलांच्यात लहानपणापासूनच योगाचे संस्कार होत आहेत .यातूनच नवीन पिढी चांगले संस्कार घेऊन मोठी होत आहे .

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदेश बारजानकर यांनी केले. तुलसीदास मंगेशकर यांनी आभार प्रदर्शन केले. सूत्रसंचालन देवेंद्र गावकर यांनी केले.

फेब्रुवारीमध्ये घेण्यात येणाऱ्या खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये सहा मुलांची निवड झाली आहे यामध्ये विद्याथ लोटलीकर ,आरुष गावकर ,आरिफ खान, फर्जिन जकाती ,याशिका चेवली ,मनस्वी दास.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar