अकासा एअरने गोव्याला आपल्या जलद वाढणाऱ्या नेटवर्कमधील 12वे डेस्टीनेशन म्हणून सेवा सुरू

.

*अकासा एअरने गोव्याला आपल्या जलद वाढणाऱ्या नेटवर्कमधील 12वे डेस्टीनेशन म्हणून सेवा सुरू केली आहे*

*राष्ट्रीय, 10 जानेवारी 2023:* अकासा एअर, भारतातील सर्वात नवीन विमान कंपनी, तिच्या नेटवर्कवरील 12 वे शहर, गोवा येथून आपल्या पहिल्या उड्डाणाचे उद्घाटन करणार आहे. मुंबई आणि पुणे यानंतर, गोवा हे विमान कंपनीच्या नेटवर्कमध्ये जोडले जाणारे भारताच्या पश्चिम भागातील तिसरे शहर आहे. अकासा एअर 11 जानेवारी 2023 पासून गोवा ते मुंबई आणि गोवा ते बेंगळुरू पर्यंत दररोज दुहेरी फ्लाइट ऑफर करणार आहे. 1 फेब्रुवारी 2023 पासून, एअरलाइन दररोज एक अतिरिक्त फ्लाइट जोडून गोवा ते बेंगळुरू पर्यंत त्यांची वारंवारता वाढवेल.
बेंगळुरू-गोवा मार्गावरील पहिले अकासा एअर फ्लाइट QP1392 बुधवार 11 जानेवारी 2023 रोजी न्यू गोवा मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ (मोपा) येथे IST 1000 वाजता उतरणार आहे.
गोवा हे भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे आणि अलीकडे अनेक आघाडीच्या कंपन्यांसाठी उत्पादन केंद्र म्हणूनही उदयास आले आहे. अकासा एअरच्या नेटवर्कवरील नवीनतम डेस्टीनेशन म्हणून गोव्याचे लॉन्चिंग, मुंबई आणि बेंगळुरूला कनेक्टिव्हिटी सुलभ करणे, देशभरातील महत्त्वाचे वाहतूक दुवे मजबूत करण्याच्या एअरलाइनच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करते. अकासा एअरचे गोव्यातील ऑपरेशन्स प्रवासाची मागणी पूर्ण करेल, पर्यटकांच्या अस्तीत्वाची वाढ करून आर्थिक वाढीला अनुकूल करेल.
अकासा एअरचे सह-संस्थापक आणि चीफ कमर्शियल ऑफिसर, प्रवीण अय्यर यांनी ऑपरेशनच्या सुरूवातीबद्दल बोलतांना सांगितले, “आम्हाला आमच्या व्यावसायिक प्रक्षेपणानंतर पाच महिन्यांच्या आत आमच्या 12व्या डेस्टीनेशनवरून उड्डाण करताना आनंद होत आहे. आमची देशांतर्गत कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी, समुद्रकिनारे असलेल्या शहराला मुंबई आणि बेंगळुरूशी जोडता आल्याने आम्हाला आनंद होत आहे. संपूर्ण भारतातील बळकट उपस्थिती विकसित करण्याचे आमचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आम्ही दर 15 दिवसांनी विमानासह आमचे नेटवर्क सतत विस्तारत आहोत.”
अकासा एअरचे सह-संस्थापक आणि मुख्य विपणन आणि अनुभव अधिकारी बेल्सन कौटिन्हो, म्हणाले, “आम्हाला अकासाचा अनुभव गोव्यात आणताना आनंद होत आहे आणि टीम अकासा एक विश्वासाची एअरलाइन बनण्याचे आमचे वचन पूर्ण करण्यासाठी आणि विश्वसनीय सेवा देण्यास उत्सुक आहे. अकासा गोव्यात आपले पंख पसरवत असताना, आम्हाला आमच्या मानवी आणि सर्वसमावेशक प्रवासाच्या अनुभवाने आनंदी आठवणी निर्माण करण्याची आशा आहे.”
अकासा एअरने अलीकडेच हैदराबाद-बेंगळुरू आणि हैदराबाद-गोवा मार्गांवर 25 जानेवारी 2023 पासून सुरू होणार्‍या दैनंदिन उड्डाण ऑफर करत असलेल्या नेटवर्कवरील 13 वे डेस्टीनेशन म्हणून हैदराबादची घोषणा केली.
या वर्षी ऑगस्टमध्ये सुरूवात झाल्यापासून, अकासा एअर त्याच्या ऑपरेशन्समध्ये हळूहळू वाढ करत आहे आणि जानेवारीच्या अखेरीस अहमदाबाद, बेंगळुरू, कोची, चेन्नई, मुंबई, दिल्ली, गुवाहाटी, अगरतळा, पुणे, विशाखापट्टणम, लखनौ, गोवा, आणि हैदराबाद या 13 शहरांमध्ये एकूण 20 मार्गांवर 500 हून अधिक साप्ताहिक उड्डाणे पार करण्याची अपेक्षा आहे.
मेट्रो ते टियर 2 आणि 3 मार्ग कनेक्टिव्हिटीवर लक्ष केंद्रित करून, दर 15 दिवसांनी एक नवीन विमान जोडणारी फ्लाईट विस्तार योजना वापरून संपूर्ण भारतातील मजबूत उपस्थिती प्रस्थापित करण्यासाठी एअरलाइन आपले नेटवर्क वाढवत राहील. अकासा एअरच्या ताफ्याचा आवाका मार्च 2023 च्या अखेरीस 18 विमानांचा असेल आणि पुढील चार वर्षांत, एअरलाइन 54 अतिरिक्त विमानांची भर घालेल, आणि तिच्या एकूण ताफ्याचा आकार 72 विमानांवर जाईल.
अकासा एअरवरील फ्लाइट्सची बुकिंग तिच्या वेबसाइट – www.akasaair.com, Android आणि IOS अॅप तसेच ट्रॅव्हल एजंट आणि देशभरातील अनेक OTAs द्वारे उपलब्ध आहे.

अकासा एअर बद्दल
अकासा एअर ही भारतातील सर्वात नवीन आणि सर्वात विश्वासार्ह एअरलाइन कंपनी आहे, जी उबदार आणि कार्यक्षम ग्राहक सेवा, विश्वासार्ह ऑपरेशन्स आणि परवडणारे भाडे ऑफर करते – सर्व काही अकासा वे मध्ये आहे. अकासा चे युवा विचाराचे व्यक्तिमत्व, कर्मचारी-केंद्रित तत्वज्ञान, तंत्रज्ञानाच्या नेतृत्वाखालील दृष्टीकोन आणि सेवेची संस्कृती ही वचनबद्धता सर्व भारतीयांसाठी प्रत्यक्षात आणेल. भारतातील वाढत्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी वाहकाने 07 ऑगस्ट 2022 रोजी पहिले व्यावसायिक उड्डाण सुरू केले.

सामाजिकरित्या जबाबदार असण्याच्या वचनबद्धतेसह, अकासा एअरने CFM इंधन कार्यक्षम, LEAP-1B इंजिनद्वारे समर्थित 72 बोईंग 737 MAX विमानांची फर्म ऑर्डर दिली आहे. 737 MAX फॅमिली एअरक्राफ्ट इंधनाचा वापर आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी उच्च कार्यक्षमता देते, ज्यामुळे भारतीय आकाशातील सर्वात तरुण आणि सर्वात हिरवे फ्लाईट असलेली पर्यावरणास अनुकूल कंपनी बनण्याचे एअरलाइनचे वचन पूर्ण करते.

*अधिक माहितीसाठी भेट द्या* www.akasaair.com
Twitter: @AkasaAir
LinkedIn: https://www.linkedin.com/company/akasaair/

*संपर्क:*
अकासा एअर कॉरपोरेट कम्युनिकेशन्स
media@akasaair.com

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar