लव्ह जिहादमध्ये बॉलीवूडची साथ’ या विषयावर विशेष संवाद !_*

.

 

*_‘लव्ह जिहादमध्ये बॉलीवूडची साथ’ या विषयावर विशेष संवाद !_*

*बॉलिवूडवाले माफी मागत नाहीत, तोपर्यंत मुसलमान धार्जिण्या चित्रपटांवर बहिष्कार चालू ठेवा !* – तान्या, संपादिका, संगम टॉक्स

गेली काही वर्षे इस्लामला महत्त्व देणारे आणि हिंदु धर्मविरोधी चित्रपट बनवले जात आहेत. नायक मुसलमान धार्जिणा, तर खलनायक हिंदूंना दाखवले जाते. चित्रपटांतून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन दिले जात आहे; पण आता हिंदू जागृत होऊन अशा चित्रपटांवर बहिष्कार घालत असल्याने बॉलीवूडची आर्थिक हानी होत आहे. अशा वेळी सुनील शेट्टीसारख्या हिंदू अभिनेत्याला पुढे करून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला जात आहे; पण अजूनही बॉलीवूडवाले माफी मागायला तयार नाहीत. यात मोठ्या प्रमाणात पैशांचा खेळ आहे. बॉलीवूडने त्यांना पैसे पुरवणारी जी टोळी आहे, त्यांना आपले मायबाप मानले आहे. प्रत्यक्षात प्रेक्षक मायबाप आहेत, हे ते विसरले आहेत; म्हणूनच याची जोपर्यंत त्यांना जाणीव होत नाही, तसेच ते माफी मागत नाहीत, तोपर्यंत मुसलमान धार्जिण्या चित्रपटांवरचा बहिष्कार चालू ठेवला पाहिजे, *असे आवाहन ‘संगम टॉक्स’च्या संपादिका तान्या यांनी केले आहे.* हिंदु जनजागृती समिती आयोजित *‘लव्ह जिहादमध्ये बॉलीहूडची साथ !’* या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवादात त्या बोलत होते.

या वेळी *‘लेखक, स्तंभलेखक आणि संशोधक’ श्रीमती रती हेगडे म्हणाल्या की,* बॉलीवूडचे सिनेमे आणि वेबसिरीज यांतून विवाहपूर्व अन् विवाहबाह्य शारीरिक संबंध हे सामान्य आहेत, असे दाखवले जात आहे. हिंदु धर्मातील पंडित, संस्कार, रीती या जुनाट आणि बुरसटलेल्या आहेत, तर इतर पंथातील धार्मिक कृती पवित्र असून त्यांचे धर्मगुरु हे उदात्त विचारसरणीचे आहेत, असेही दाखवले जाते. तसेच हिंदु मुलीचे मुसलमान मुलाशी संबंध हे खरे आदर्श प्रेम आहे, आणि केवळ हीच मुले आपला सन्मान करू शकतात, स्वातंत्र्य देऊ शकतात, असे दर्शवले जाते. प्रत्यक्षात मात्र हे धर्मांतराचे मोठे षड्यंत्र आहे, जे हिंदु मुलींना समजत नाही. त्यामुळे त्या ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अडकतात.

या वेळी *हिंदु जनजागृती समितीचे मध्य प्रदेश आणि राजस्थान राज्यांचे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया सांगितले की,* केवळ चित्रपटच नव्हे, तर ज्या जाहिराती दाखवल्या जातात, त्यातून अनेक हिंदु प्रथा-परंपरावर आघात केले जातात, तसेच जुन्या परंपरांविषयी न्यूनगंड निर्माण करून त्या बदलण्याची वेळ आली आहे, असा संदेश दिला जातो. सुनील शेट्टी ‘सर्व बॉलिवूडवाले वाईट नाहीत’, असे म्हणतात; पण ज्या वेळी ‘लव्ह जिहाद’ला खतपाणी घालणारे चित्रपट किंवा जाहिराती आल्या, त्याविरुद्ध त्यांनी आवाज का उठवला नाही? आज जेव्हा बॉलीवूड ट्रोल होत आहे, तेव्हा हिंदूंचा आवाज दाबण्यासाठी का पुढे आलात ? केवळ व्यवसाय आणि पैसे यापुढे देश आणि धर्म याबद्दल काहीच वाटत नाही.

आपला नम्र,
*श्री. रमेश शिंदे,*
राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.
(संपर्क : 99879 66666)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar