हळदोण्याचे आमदार अ‍ॅड. कार्लुस आल्वारेस फरेरा यांनी राज्य सरकारला लाडली लक्ष्मीचे प्रलंबित अर्ज निकालात काढण्याचा वेग वाढविण्याचे आवाहन

.
थिवी वाताहार
 हळदोण्याचे आमदार अ‍ॅड. कार्लुस आल्वारेस फरेरा यांनी राज्य सरकारला लाडली लक्ष्मीचे प्रलंबित अर्ज निकालात काढण्याचा वेग वाढविण्याचे आवाहन केले आहे. हळदोणा येथे आपल्या निवासस्थानी शनिवारी लाडली लक्ष्मीच्या 15 लाभार्थींना वितरण करताना त्यांना संबंधित वक्तव्य केले.
सरकारने ही योजना लग्न करणार्‍या युवा मुलींना मदत करण्याच्या उद्देशाने सरकारने ही योजना सुरू केली आहे. वेळेत अर्ज निकालात काढल्यास या योजनाचा निधी संबंधितापर्यंत वेळेत पोहोचेल व त्याचा अधिक फायदा होईल, असे फरेरा म्हणाले. अनेकांचे अर्ज अनेक वर्षे प्रलंबित आहेत. त्यामुळे मी हे अर्ज लवकरात लवकर निकालात काढण्याचे आवाहन करतो. अनेकांना अर्ज करून आपले अर्ज मान्य होण्याची ते वाट पाहत आहेत. त्यांना अजूनही या योजनेचा लाभ झालेला नाही. अर्ज निकालात काढण्याचा वेग काही प्रमाणात वाढला असल्याने मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. समाजकल्याण मंत्री विश्वजीत राणे यांनी स्वतः लक्ष घालून लाडली लक्ष्मी अर्जांच्या मान्यतेला व वितरणाचा वेग वाढविल्याने त्यांचे आभार मानतो. 2022 सालापर्यंतचे अर्ज लवकरात लवकर निकालात काढण्याचे मी त्यांना आवाहन करतो. विधवा योजनेची वाढीव रक्कमही लवकरात लवकर द्यावी, असे आवाहनही त्यांनी सरकारला यावेळी केले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar