शिवोली,ता. 14(प्रतिनिधी): आजच्या धाकधुकीच्या जीवनात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावुन आपापल्या संसाराचा गाडा हांकतांना महिला वर्गाचे आपल्या आरोग्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे त्यामुळेच इतर आजारांबरोबरच स्तन कर्करोगाचेही प्रमाण वाढीस लागत असल्याचे दिसून येत आहे. महिलांनी अशा लोकांकडे दुर्लक्ष केल्यास हाच रोग जीवघेणा करुं शकतो त्यामुळे युवराज सिंग फाऊंडेशन सारख्या संस्थांद्वारे जागोजागी आयोजित करण्यात येत असलेल्या स्तन कर्करोग निदान व उपचार या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन फाऊंडेशनच्या जेष्ठ डॉ. हडफडकर यांनी शिवोलीत केले. युवराज सिंग फाऊंडेशन-गोवा, शिवोलीतील स्वामी समर्थ मठ तसेच स्थानिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने मठाच्या अन्नछत्र विभागात महिलांसाठी आयोजित स्तन कर्करोग निदान व चाचणी शिबीराचे त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर मठाचे संस्थापक निलेश वेर्णेकर, फाऊंडेशनच्या डॉ. निकी हडफडकर, डॉ.श्रुती गांवकर, डॉ प्रतिक्षा सक्सेना, मार्ना- शिवोली मंडळाचे सदस्य अमीत मोरजकर, समर्थन संघटणेचे अध्यक्ष प्रेमानंद आरोलकर , सचीव यदुवीर सिमेपुरुषकर, नितीन आगरवाडेकर, दीपक आगरवाडेकर, आदी मान्यवर उपस्थित होते. मठाचे संस्थापक निलेश वेर्णेकर यांनी लोकहीत नजरेसमोर ठेवून वेळोवेळी मठ परिसरात समाजपयोगी कार्यक्रम, उपक्रम तसेच आरोग्य शिबीरांचे वेळोवेळी आयोजन केले जात असल्याचे सांगितले तसेच येत्या गुरुवारी (ता .19 जानेवारी) पूरुष-महिला तसेच युवा वर्गासाठी शरीरचाचणी तसेच मोफत दंतचिकित्सा शिबीराचे मठाच्या सभागृहात सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत एका खाजगी सेवेतील अग्रगण्य वैद्यकीय संस्थेद्वारा विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले व पंचक्रोशीतील सर्वानीच या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संतोष गोवेकर यांनी तर आभार यदुवीर सिमेपुरुषकर यांनी केले. या शिबीराचा लाभ एकुण शंभरेक महिलांनी घेतला.
फोटो : शिवोलीत आयोजित स्तन कर्करोग शिबीराचे सम इ प्रज्वलित करून शुभारंभ करतांना निलेश वेर्णेकर, प्रेमानंद आरोलकर, तज्ञ महिला डॉक्टर्स व इतर : संतोष गोवेकर.
आजच्या धाकधुकीच्या जीवनात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावुन आपापल्या संसाराचा गाडा हांकतांना महिला वर्गाचे आपल्या
.
[ays_slider id=1]