गोवा युथ काँग्रेस कायम दुमदुममणारी व सक्रीय असेल नूतन अध्यक्ष जोएल आंद्राद पणजी ः

.

 

 

गोवा युथ काँग्रेस कायम दुमदुममणारी व सक्रीय असेल
नूतन अध्यक्ष जोएल आंद्राद

पणजी ः
गोवा युथ काँग्रेस ही संघटना दुमदुमणारी व सक्रीय असेल, असे गोवा युथ काँग्रेसचे नव्याने नियुक्त झालेले अध्यक्ष जोएल आंद्राद यांनी सांगितले आहे. भारत जोडा यात्रेचा अनुभव हा समृध्द करणारा होता, असे ते म्हणाले.
पणजी येथे येथील मॅरियट रिसोॅर्ट अँड स्पा येथे सोमवारी झालेल्या गोवा युथ काँग्रेसच्या दिमाखदार नवीन समिती स्थापना सोहळ्यानिमित्त ते बोलत होते. भारतीय युथ काँग्रेसच्या सचिव व गोवा प्रभारी रिची भार्गव व काँग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पक्षाचे बॅटन आंद्राद यांच्याकडे सुपूर्द केले.
यावेळी भारतीय युथ काँग्रेसच्या सचिव व गोवा प्रभारी रिची भार्गव यांनी नवीन अध्यक्षांचे अभिनंदन करताना त्यांना नियुक्तीपत्र दिले.
‘अधिकृतरित्या गोवा प्रदेश युथ काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून ताबा हा मार्गदर्शक गिरीश चोडणकर व रिची भार्गव यांच्या उपस्थितीत स्वीकारल्याचा आनंद होत आहे. समितीच्या वतीने मी काँग्रेस पक्ष व नेतृत्वाचा माझ्यासारख्या युवा व उभरत्या नेत्याला संघटनेचे नेतृत्व करण्याची संधी दिल्याबद्दल आभारी आहे, असे आंद्राद म्हणाले.
‘आम्ही गोव्याच्या लोकांना विश्वास देतो की भारतीय युथ काँग्रेस ही संघटना कायम दुमदुमणारी व सक्रीय असेल. लोक आम्हाला भारत जोडो यात्रा करण्याचे कारण विचारत आहे. आम्ही त्यांना एवढेच सांगू इच्छितो की सामाजिक, राजकीय व आर्थिक विषयांवर आवाज उठवण्यासाठी ही यात्रा आहे. देशातील लोकांना प्रेम व जिव्हाळा देण्यासाठी ही यात्रा आहे. सध्या लोक बेरोजगारी, वाढती महागाई, अन्यायाचा सामना करत आहेत. समस्यांची ही यादी कधीच संपणारी अशी आहे. विरोधी पक्षाला आम्ही परिधान केलेल्या टी शर्टची चिंता आहे. कोणते हॉटेल आम्हाला पुरस्कृत करते, आमचे नेते कुठे चहा पितात या बद्दल ते अधिक उत्सुक आहे. चहाचा पेला हटवून त्या जागी मद्याचा पेला ठेवून समाज माध्यमांमध्ये तो फिरवण्या इतपत ते हतबल झाले आहेत. वैयक्तिकरित्या माझ्यासाठी हा समृद्ध करणारा अनुभव आहे. आयुष्यभरासाठी मी हा अनुभव जपून ठेवणार आहे, असे आंद्राद म्हणाले.
आज गोव्यासाठी ऐतिहासिक दिवस आहे. आजच्या दिवशी 1967 साली गोव्यात ओपिनियन पोल झाला होता. या ओपिनियनपोलमुळे गोव्याचे भविष्य निश्चित झाले होते. पदाचा ताबा घेण्यासाठी या दिवसापेक्षा अधिक चांगला दिवस असूच शकत नाही. या दिवसाच्या 50 वर्षांनंतरही आमची ओळख वाचवण्यासाठी व राखण्यासाठी आमचा संघर्ष सुरूच आहे, असे आंद्राद म्हणाले.
गोवा युथ काँग्रेसच्या अध्यक्षांनी लोकांना भेडसावणारे प्रश्न आक्रमकपणे घेत लोकांचा आवाज बनण्याचे आवाहन यावेळी चोडणकर यांनी केले. नवीन युथ अध्यक्षांनी ड्रग्स, बेरोजगारी, शिक्षण आदी प्रश्न प्राधान्याने घेण्याचे आवाहन चोडणकर यांनी केले. गोव्याचा बुलंद आवाह होऊन सरकारची कुकर्मे उघडे पाडण्याचा आक्रमकपणे प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. अटक होणे, तुरुंगात जाण्यामुळे नेतृत्व कौशल्य अधिक मजबूत होते. संघटना बांधतानाच संख्या वाढवणे युवांशी जोडण्याकडे भर द्यावा, असेही चोडणकर यांनी यावेळी सांगितले. पक्ष पुढे नेण्यासाठी युथ काँग्रेसची जबाबदारी मोठी असून भविष्यातील मोठे नेते याच मार्गातून पक्षाला मिळत आहेत, असे चोडणकर म्हणाले.
उत्तर गोवा युथ काँग्रेस अध्यक्ष रिनाल्डो रुझारियो यांनी काँग्रेस पक्षाला युवांची गरज असल्याचे सांगत याच माध्यमातून एकत्र येऊन पक्ष पुन्हा मजबूत होणार असल्याचे सांगितले. ‘युुथ काँग्रेसने आपले नाणे खणखणीत असल्याचे भारत जोडो यात्रा अभियानातून दाखवून दिले आहे. या यात्रेमुळे देशात जागृती झाली आहे. कोरोना काळात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता गरजूंची मदत केली आहे. युथ काँग्रेस ही अशी संघटना आहे जी सर्व बंधने झुगारून पक्षाला नवसंजीवनी देण्याची क्षमता बाळगून आहे, असे ते म्हणाले.
दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष महेश नाडर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, भारतीय युथ काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही, संयुक्त सचिव कृष्णा अलावारू आदींचे आभार मानले.
‘आमचे काम आता खर्या अर्थाने सुरू झाले आहेत. लोकांपर्यंत पोहोचून त्यांना एकत्र आणण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. चांगला समाज घडविण्यासाठी लोकांना अधिक जागृत, शिक्षित करण्याची आमची तयारी आहे. यामुळेच काँग्रेस पक्षासाठी मजबूत पाया घडणे शक्य आहे. प्रत्येक कठीण परिस्थितीत आम्ही लोकांसोबत असून आमचे अस्तित्व दाखवून देऊ. लोकांच्या चेपल्या जाणार्या आवाजाला पाठबळ देण्याची जबाबदारी आमची असेल, असे ते म्हणाले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar