श्री सातेरी मंदिर कामुर्ली येथे मकर संक्रांत
पीपल्स हायस्कूल कामुर्ली व श्री सातेरी प्राथमिक विद्यामंदिर या दोन्ही विभागांनी मिळून श्री सातेरी मंदिरात १४ जानेवारी २०२३ रोजी मकर संक्रांत साजरी केली.संपूर्ण कार्यक्रम शिक्षिका कुमारी पूजा शेट्ये व शिक्षिका सौ सुनीता मालदार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ श्रद्धा लोटलीकर यांनी गणेश वंदनेने केले. सर्वात प्रथम दीप प्रज्वलनाने तसेच भारत मातेच्या प्रतिमेला हार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शाळेची हितचिंतक तसेच गावची नामांकित रहिवासी सौ. दीपा शेट्ये तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री संदीप पाळणी सर उपस्थित होते. पाहुण्यांची ओळख शिक्षिका सौ स्नेहा नाईक यांनी केली. शिक्षिका कुमारी पूजा शेट्ये यांनी मुलांना मकर संक्रांतीची माहिती दिली. नंतर प्रमुख पाहुण्यांनी आपल्या अमूल्य भाषणाद्वारे मुलांना सगळ्यांबरोबर मनाने गोड गोड बोलण्यास प्रोत्साहित केले तसेच मकर संक्रांतीचा उपक्रम म्हणून मुलांकडून सभागृहात पतंग बनवून घेतले व ते सातेरी वाड्यावरील पटांगणात एकत्र मिळून आकाशात उडविले. मुलांना पारंपारिक पद्धतीने बनवलेले तीळ व गुळ वाटून त्यांचे तोंड गोड केले व “तिळगुळ खा गोड गोड बोला “हा संदेश दिला. शेवटी शिक्षिका सौ गौरी नाईक यांनी आभार प्रदर्शन केले व शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.