व्यवसायांसाठी पूर्णपणे डिजिटल चालू खाते सुरू करण्यासाठी अॅक्सिस बँकेची ओपीइएन सोबत भागीदारी

.

व्यवसायांसाठी पूर्णपणे डिजिटल चालू खाते सुरू करण्यासाठी अॅक्सिस बँकेची ओपीइएन सोबत भागीदारी
अॅक्सिस बँकेच्या बरोबरीनेच ग्राहक आता ओपीइएन (OPEN) च्या फायनानशिअल ऑटोमेशन या फिचर च्या सहाय्याने सुद्धा बँकिंग सेवा घेऊ शकतात.
पॅन कार्ड आणि आधार कार्ड वापरुन आणि व्हिडिओ केवायसी करून प्रमाणीकरण प्रक्रिया (authentication) पूर्णपणे डिजिटल पद्धतीने केली जाईल.
ग्राहक २५० हून अधिक बँकिंग सेवांचा लाभ घेऊ शकतात आणि ग्रॅब डील द्वारे ५०% पर्यंत कॅशबॅक ही मिळवू शकतात.
मुंबई, ५ जानेवारी,२०२२: भारताची तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी खासगी बँक अॅक्सिस बँकेने एसएमइ स्, फ्रीलान्सर, गृह उद्योजक (होमप्रेन्यूअर्स), प्रभावक (इन्फ्लूएनसर) अशा ग्राहकांसाठी ‘संपूर्णपणे नेटिव्ह डिजिटल चालू खाते प्रवास’ प्रदान करण्यासाठी जगातील सर्वात वेगाने वाढणारे डिजिटल बँकिंग एंटरप्राइझ ओपीइएन (OPEN) सोबत भागीदारी केली आहे. ही भागीदारी मोठ्या व्यावसायिक समुदायाला पेमेंट, ताळेबंद, खर्च व्यवस्थापन, नियमांचे अनुपालन आणि इतर अशा अनेक सेवांसह व्यवसाय व्यवस्थापनेसाठी ओपीइएन (OPEN) च्या ‘एंड टु एंड फायनानशिअल ऑटोमेशन टूल’ च्या सहाय्याने अॅक्सिस बँकेचा समग्र बँकिंग अनुभव देईल.
पूर्णपणे डिजिटल चालू खाते सुरू करण्यासाठी एखाद्या फिनटेक कंपनी सह अॅक्सिस बँकेची ही पहिलीच भागीदारी आहे. ही सेवा आधीच ओपीइएन (OPEN)च्या वेब साइट वर चालू झाली आहे. (www.open.money)
हे डिजिटल चालू खाते ग्राहकांचा खूप वेळ आणि मेहनत वाचवतील कारण
यामध्ये पॅन कार्ड आणि आधार कार्ड वापरुन प्रमाणीकरण प्रक्रिया (authentication) पूर्णपणे डिजिटल पद्धतीने केली जाईल आणि त्यानंतर व्हिडिओ केवायसी केले जाईल. झीरो डॉक्युमेंट्स आणि कॉनटॅक्टलेस प्रकिया या वैशिष्ठ्यांमुळे कागदपत्रांचा त्रास दूर करणाऱ्या, सोईस्कर व आरामदायी खाते उघडण्याची प्रक्रिया असल्याने ही चालू खाते सेवा बाजारातील इतर सेवांपेक्षा लक्षणीय रीतीने वेगळी आहे. हे खाते वापरुन ग्राहक २५० हून अधिक बँकिंग सेवांचा लाभ घेऊ शकतात आणि ग्रॅब डील द्वारे ५०% पर्यंत कॅशबॅक ही मिळवू शकतात. या भागीदारीमुळे अॅक्सिस बँकेच्या सर्व विद्यमान खातेदारांना ओपीइएन (OPEN)च्या ‘ऑल-इन्-वन डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्म’ मध्ये प्रवेश मिळेल, जो सध्या ३० लाखाहून अधिक व्यवसायांद्वारे वापरला जात आहे.
अॅक्सिस बँकेच्या डिजिटल बिझनेस अँड ट्रान्सफॉर्मेशन विभागाचे अध्यक्ष व प्रमुख श्री. समीर शेट्टी या भागीदारी बाबत बोलताना म्हणाले, “अॅक्सिस बँकेमध्ये आम्ही आमच्या सर्व प्रयत्नांच्या केंद्र स्थानी ग्राहकांना ठेवण्यावर विश्वास ठेवतो आणि त्याच बरोबर प्रणालीतील सर्व भागधारकांसाठी सामायिक मूल्य देखील निर्माण करतो. ग्राहकांना डिजिटल बँकिंग सोल्यूशन्स प्रदान करण्यासाठी आम्ही सातत्याने नावीन्यपूर्ण भागीदारी मॉडेल्सवर काम करीत आहोत. या प्रयत्नात, व्यवसायांसाठी एकाच ठिकाणी सर्व बँकिंग सोल्यूशन्सदेता यावे म्हणून आम्ही ओपीइएन (OPEN) सोबत भागीदारी केली आणि याचा आम्हाला खूप आनंद होत आहे.”
या भागीदारीबद्दल बोलताना ओपीइएन (OPEN) चे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) श्री. अनिश अच्युतन म्हणाले, “ग्राहकांसाठी पूर्णतः नेटिव्ह डिजिटल चालू खाते प्रवास सुरू करण्यासाठी अॅक्सिस बँकेच्या सोबत भागीदारी करताना आम्ही खरोखरीच खूप उत्साही आहोत. व्यवसायायिक बँकिंग गृह उद्योजक (होमप्रेन्यूअर्स) आणि प्रभावक (इन्फ्लूएनसर) अशा नवीन आणि खास क्षेत्रासाठी खुली होत आहे. आम्ही त्यांच्यासाठी खासकरून बनवलेली उत्पादने अॅक्सिस बँकेच्या भागीदारी ने तयार करण्यास उत्सुक आहोत. आम्ही या वापरकर्त्यांसाठी मुदत कर्ज, महसूल आधारित वित्त पुरवठा आणि अशा वेगवेगळ्या मूल्यवर्धित सेवा देण्यासाठी कार्यरत राहू.”

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar