।।श्री।।
म्हापसा, १७ जानेवारी – प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने म्हापसा येथील उपजिल्हाधिकारी श्री. गुरुदास देसाई यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये सनातन संस्थेचे श्री. श्याम वडेर, सौ. शर्वाणी आगरवाडेकर, धर्मप्रेमी श्री. दिनेश चावडा, श्री. सुनिल खाड्ये, मंदिर महासंघाचे श्री. चंद्रकांत (भाई ) पंडित, धर्मप्रेमी श्री.संजय नायक, श्री. श्याम साखळकर यांचा समावेश होता. निवेदनात म्हटले आहे की, प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचे उत्पादन वा विक्री, ‘ऑनलाईन’ पद्धतीने अशोकचक्रासह तिरंग्याचा मास्कची होणारी विक्री यांवर आळा घालावा.