मयडे येथे गुरूपूजन कार्यक्रम
थिवी (वार्ताहर) : श्री दत्त पद्मनाभ पीठ संप्रदाय तपोभूमी संचालित संत समाज मयडेचे रामा साटेलकर यांच्या आईच्या वीसाव्या पुण्यतिथीनिमत्त गुरू पुजन तथा प्रवचनाचा कार्यक्रम त्यांच्या निवासस्थानी पार पडला.
यावेळी बार्देश तालुक्यातील प्रचारक व संत समाजाचे अध्यक्ष, तालुका प्रमुख आणि गुरूबंधू भगिनी उपस्थित होते. यावेळी असोळण्याचे प्रचारक सच्चिदानंद नाईक व वाचक शंकर गाड यांनी सेवा समर्पित केली. जनउत्कर्ष पतसंस्थेचे चेअरमन नारायण कारेकर व अनिल सामंत यावेळी उपस्थित होते. अनंत नाईक यांनी कविता सादर केली. आर्यन उस्कईकर यांनी गीतेचा १६ अध्याय कथन केला. महेश साटेलकर यांनी आजीविषयीच्या आठवणी यावेळी सांगितल्या. सूत्रसंचालन सिद्धार्थ रेवडकर यांनी केले. किशोर साटेलकर यांनी स्वागत व आभार मानले.
फोटो : कार्यक्रमात बोलताना असोळण्याचे प्रचारक सच्चिदानंद नाईक व वाचक शंकर गाड व इतर. (छाया : भारत बेतकेकर)
मयडे येथे गुरूपूजन कार्यक्रम

.
[ays_slider id=1]