एसबीआय लाइफ इन्श्यूरन्सने ३१ डिसेंबर २०२२ रोजी संपलेल्या कालावधीसाठी रु.२१,५१२ कोटींच्या नवीन व्यवसाय प्रिमियमची नोंदणी केली
एसबीआय लाइफ इन्श्यूरन्सने एक देशातील अग्रगण्य जीवन विमा कंपन्यांपैकी ३१ डिसेंबर २०२२ रोजी संपलेल्या कालावधीसाठी रु.२१,५१२ कोटींच्या नवीन व्यवसाय प्रिमियम ची नोंदणी केली. हेच, ३१ डिसेंबर २०२१ रोजी संपलेल्या कालावधीसाठी कंपनी ने रु.१८,७९१ कोटींच्या नवीन व्यवसाय प्रिमियम ची नोंदणी केली होती. ३१ डिसेंबर २०२१ रोजी संपलेल्या याच कालावधीच्या तुलनेत नियमित प्रिमियममध्ये २२% नी वाढ झाली आहे.
सुरक्षा योजनांवर स्पष्ट लक्ष केंद्रित करून, ३१ डिसेंबर २०२२ रोजी संपलेल्या कालावधीसाठी एसबीआय लाइफचे सुरक्षा नवीन व्यवसाय प्रिमियम २५% वाढ नोंदवत रु.२,५४५ कोटी एवढे झाले. सुरक्षा वैयक्तिक नवीन व्यवसाय प्रिमियम ३१ डिसेंबर २०२२ रोजी संपलेल्या कालावधीसाठी १२% वाढ नोंदवत रु.६९६ कोटी एवढे झाले. ३१ डिसेंबर २०२१ रोजी संपलेल्या याच कालावधीच्या तुलनेत ३१% वाढ नोंदवत वैयक्तिक नवीन व्यवसाय प्रिमियम रु.१५,२४२ कोटी झाले.
३१ डिसेंबर २०२२ रोजी संपलेल्या कालावधीसाठी एसबीआय लाइफचा टॅक्स कापल्यानंतरचा नफा (PAT) रु.९४४ कोटी एवढा झाला.
१.५० च्या नियामक आवश्यकतेच्या तुलनेत ३१ डिसेंबर २०२२ रोजी कंपनीचे सॉल्व्हेंसी रेशो २.२५ वर मजबूत राहिले.
३१ डिसेंबर २०२१ रोजी रु.२,५६,८७१ असलेले एसबीआय लाइफ चे एयूएम (अॅसेट अन्डर मॅनेजमेंट) देखील ३१ डिसेंबर २०२२ रोजी ७१:२९ एवढ्या डेट इक्विटी मिक्स सह १७% नी वाढून २,९९,९८७ कोटी झाले. ९५% पेक्षा जास्त कर्ज गुंतवणूक एएए (AAA) आणि सार्वभौम साधनांमध्ये आहे.
कंपनी कडे २,५५,८४८ प्रशिक्षित विमा व्यावसायिकांचे वैविध्यपूर्ण वितरण नेटवर्क आहे आणि मजबूत बँकाश्योरन्स चॅनल, एजन्सी चॅनेल ब्रोकरस्, अन्य कॉर्पोरेट एजेंटस्, पॉइंट ऑफ सेल पर्सन्स (POS), विपणन कंपन्या वेब एग्रिगेटरस् आणि थेट व्यवसाय यांच्यासह देशभरात ९९० कार्यालयांसह विस्तृत उपस्थिती आहे.
३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या कालावधीतील कामगिरी
वैयक्तिक एनबीपी (NBP- न्यू बिझनेस प्रॉफिट) ३१% वाढ आणि २७.२% मार्केट शेअर सह रु.१५,२४२ कोटींपर्यंत जाऊन खासगी बाजार नेतृत्व प्रस्थापित
एपीइ (APE अॅन्युअल प्रिमियम इक्विवॅलंट ) २०% वाढीसह रु.१२,२५६ कोटींपर्यंत
सुरक्षा एनबीपी (NBP- न्यू बिझनेस प्रॉफिट) २५% वाढीसह रु.२,५४५ कोटींपर्यंत
वॅल्यू ऑफ न्यू बिझनेस (VoNB) ४४% वाढीसह रु.३,६३० कोटींपर्यंत
वॅल्यू ऑफ न्यू बिझनेस (VoNB) मार्जिन ४७८ बीपीएस ने वाढून २९.६% पर्यंत.
टॅक्स कापल्यानंतरचा नफा (PAT) १३% नी वाढून रु.९४४ कोटींपर्यंत
२.२५ असा मजबूत सॉल्व्हेंसी रेशो
अॅसेट अन्डर मॅनेजमेंट (AUM) २,९९,९८७ कोटी झाले.
एसबीआय लाइफ इन्श्यूरन्सने ३१ डिसेंबर २०२२ रोजी संपलेल्या कालावधीसाठी रु.२१,५१२ कोटींच्या नवीन व्यवसाय प्रिमियमची नोंदणी
.
[ays_slider id=1]