.

मॅक्स फॅशनची मॉल दी गोवामध्ये पुन्हा सुरुवात

गोवा, 21 जानेवारी 2023 ः
भारतातील सर्वांत मोठा फॅशन ब्रँड असलेल्या ‘मॅक्स फॅशन’ यांनी पर्वरी येथील मॉल दी गोवामध्ये आपल्या एक्सक्लुझिव्ह दालनाचा पुन्हा शुभारंभ केला. कंपनीच्या कर्नाटक व गोवा विभागाचे व्यवसाय प्रमुख पीयुष शर्मा आणि अन्य विभागीय तसेच दालनातील कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत शुभारंभ केला.
नवीन दालनाद्वारे ग्राहकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खरेदीचा अनुभव मिळणार आहे. पुरुषांसाठीचे, महिलांसाठीचे, मुलांसाठीचे कपडे, पादत्राणे तसेच अन्य साहित्य ग्राहकांना मिळणार असून नवीन ट्रेंड्स व कलेक्शन त्यांना एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे.
दालनाच्या लाँचिंगसंबंधी बोलताना कर्नाटक व गोवा विभागाचे व्यवसाय प्रमुख श्री. पीयुष शर्मा म्हणाले की, मॉल दी गोवामध्ये आमचे दालन पुन्हा सुरू होत असल्याचा अत्यानंद झाला आहे. या दालनाला नवीन ओळख मिळाली आहे. यामुळे ग्राहकांना खरेदीचा अत्युच्च असा अनुभव येणार आहे. ग्राहकांनी आमचा स्वीकार करतानाच दिलेल्या प्रेमामुळे आम्हाला प्रेरणा मिळाली आहे. यामुळे राज्यात आमचा विस्तार सुरूच आहे. ग्राहकांना आम्ही तयार केेलेले कपडे आवडत राहतील,आम्ही तयार केलेले कपडे परिधान करून आम्हाला कायम ते प्रेम देत राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आज मॅक्स गोव्यात पाच ठिकाणी आहे. मॅक्स फॅशनला ग्राहकांकडून भरपूर प्रसिसाद व प्रेम मिळत आहे. आगामी वर्षांत अजून काही ठिकाणी मॅक्सची दालने खुली करून विस्तारास आम्ही बांधील आहोत. यामुळे मॅक्स फॅशन हा नवीन फॅशनसह गोव्यातील परवडणार्‍या दरात कपडे खरेदीचा अनुभव देणारा गोव्यातील सर्वांत मोठा फॅशन ब्रँड होणार आहे.
नवीन दालनाच्या शुभारंभ प्रसंगी आम्ही नवीन उद्घाटनपर ऑफर आणली असून 3999 रुपयांच्या खरेदीवर 99 रुपये देऊन आकर्षक भेटवस्तू मिळणार आहे.

वसंत ऋतूसाठी विशेष कलेक्शन
वसंत ऋतूसाठी लाइम इन चाईम, फ्युशिया, कोबाल्ट ब्ल्यूच्या चमकदार कडांसह महिलांसाठी विशेष पोशाख या कलेक्शन अंतर्गत आहेत. पुरुषांसाठी ‘रेट्रो व्हेकेशन स्टाईल’चा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे या आणि आमच्या विविध रेंजमधून खरेदी करण्याचा आनंद अनुभवा.

मॅक्स फॅशनबद्दल

मॅक्स फॅशन हा ‘रोजच्या फॅशन’साठी ओळखला जाणारा हा मध्य पूर्वेतील तसेच भारतातील सर्वात मोठा फॅशन ब्रँड आहे. 2004 साली मध्य पूर्वेत पहिले दालन उघडल्यानंतर या ब्रँडने अभूतपूर्व वेगाने वाढ केली आहे. आणि आता ब्रँडचा विस्तार 19 देशांमध्ये झाला आहे. भारतात, सध्या 430 पेक्षा जास्त दुकाने आहेत 190पेक्षा अधिक दुकानांमध्ये ब्रँडची उपस्थिती आहे. सर्वांत कमी कालावधीत केवळ मध्यपूर्वेतीलच नव्हे तर भारतातील सर्वात मोठा कौटुंबिक फॅशन ब्रँड म्हणून मॅक्स फॅशन नावारुपास आला आहे.

मॅक्स फॅशनच ब्रँड दृष्टी समकालीन मध्यमवर्गासाठी फॅशनचे लोकशाहीकरण करणे आहे
आश्चर्यकारकपणे परवडणार्‍या किमतीत जागतिक फॅशन ट्रेंड ऑफर करत आहे. हे तरुणांमध्ये सार्वत्रिक आकर्षण आहे. नवीन कुटुंबांपासून ते अब्जाधीशांसाठीसुद्धा ज्यांना कपड्यांबद्दल तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जाण आहे अशांसह सर्वांना मॅक्स फॅशनचे कपडे अनुकूल आहेत. मॅक्स फॅशनचा पोर्टफोलियो हा शानदार आहे. यात पुरुष, महिलांच्या पोशाखांसह आणि अ‍ॅक्सेसरीज तसेच लहान मुलांचा देखील विचार करण्यात आला आहे.
दरवर्षी 8 हंगामात 20,000 नवीन डिझाईन्स घेऊन येत ग्राहकांना रास्त किमतीत फॅशनचा अनुभव देण्याचा मॅक्स फॅशनचा प्रयत्न असतो.

मॅक्स फॅशनचा ब्रँड हा सुविधांनी सज्ज असा फॅशन ब्रँड असून ऑनलाईन शॉपिंग अनुभवासह  ‘क्लिक अँड कलेक्ट, ‘रिटर्न टू स्टोअर, शिप फ्रॉम स्टोअर, चॅट अँड शॉप अशा सुविधा पुरवतो. हे संकेतस्थळ अनेकांच्या पसंतीस उतरले आहे. मॅक्स फॅशन अ‍ॅपमुळेदेखील अनेकांची खरेदी सोपी झाली आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar