प्रजासत्ताकदिनी भारतात लोकराज्य आले : नारायण सोपटे केरकर केरीत प्रजासत्ताक दिनी संचलन स्पर्धा

.

प्रजासत्ताकदिनी भारतात लोकराज्य आले : नारायण सोपटे केरकर
केरीत प्रजासत्ताक दिनी संचलन स्पर्धा

देशाला पारतंत्र्यातून मुक्ती मिळाल्यानंतर भारत या जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशात प्रजासत्ताक दिनी लोकराज्य आले. लोकांना हक्क मिळाले. त्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास घडू शकला. पण आपल्या हक्कासोबत देशाप्रति आपले कर्तव्य मोठे असते याची जाणीव ठेवून प्रत्येक नागरिकानी वर्तन ठेवल्यास आपल्या देशाची खऱ्या अर्थाने प्रगती होईल असे प्रतिपादन माजी पोलीस अधिकारी , समाजसेवक तथा केरी तेरेखोल परिसर विकास कल्याण व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नारायण सोपटे केरकर यांनी केरी पेडणे येथे केले.

केरी पेडणे येथील न्यू इंग्लिश हायस्कुलतर्फे भारताच्या ७४वा प्रजासत्ताक दिनानिमित्त गटशः मार्च पास्ट स्पर्धा घेण्यात आली.
त्यापूर्वी सोपटे केरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी केरकर यांच्या समवेत संस्थेचे सचिव विनायक गाड, ज्येष्ठ शिक्षिका निषिता आकरकर, मार्च पास्ट स्पर्धेचे परीक्षक सुभाष नागोजी आणि रितेश भाटलेकर आणि मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर हे व्यासपीठावर उपस्थित होते.

याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी विविध देशभक्ती गीते सादर केली. समृद्धी सावंत हिने समयोचित भाषण केले. तसेच यावर्षी घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरित करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीची विद्यार्थिनी चैताली रांगणेकर हिमे केले. कार्यक्रम प्रमुख रितेश भाटलेकर व आल्फ्रेद रोड्रिगीज यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. तर तन्वी सावळ हिमे आभार मानले.

फोटो
केरी पेडणे येथे प्रजासत्ताक दिनी आयोजित स्पर्धेचे बक्षीस वितरण करताना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नारायण सोपटे केरकर. सोबत मान्यवर.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें