सम्राट क्लब हळदोणा व  स्वर गंधार कला केंद्र नास्नोडा यांच्या संयुक्त विद्यमाने गोपीकांत शिरोडकर संचालित संगीत शाळेत स्वर तरंग

.

म्हापसा वाताहार

सम्राट क्लब हळदोणा व  स्वर गंधार कला केंद्र नास्नोडा यांच्या संयुक्त विद्यमाने गोपीकांत शिरोडकर संचालित संगीत शाळेत स्वर तरंग एक परंपरा हा सांगीतक  कार्यक्रम पार पडला.
यात संगीताचे धडे घेणाऱ्य विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली. प्रमुख पाहुणे संगीत शिक्षक आनंद नाईक यांनी दिप प्रज्वलित करून कार्यक्रम चे उदघाटन केले. शास्रीय संगीत विषयी माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना करून दिली . कु. श्रद्धा केरकर हिने गोड गोड विठ्ठला नाम तुझे गोड या अभंगाने सुरूवात केली यात संवादिनीवर अपूर्वा बुगडे व तबला साथ रुशीकेश पांचाळ यांनी केले. तबला सहवादनात कु. राज साळगावकर, प्रियांशू घाडी, दिप्तेश केरकर, कृषय शिरोडकर यांनी भाग घेतला. गोपीनाथ शिरोडकर यांनी त्यांना संगीत साथ दिली कु. सानवी रायकर हिने भूप रागावर लखछपी सावरीया हि चिज सादर केली. सौ. मंगला हळदोणकर हीने यमन रागावर बंदिश सादर केली, तबला साथ रुषिकेश पांचाळ व संवादिनी वर गोपीकांत शिरोडकर यांनी साथ दिली. कार्यक्रम समन्वयक म्हणून अमित शिंदे यांनी काम पाहिले. संगीत शाळा संचालक गोपीकांत शिरोडकर यांनी आभार मानले. सिद्धी रायकर हीने सुत्रसंचालन केले
फोटो भारत बेतकेकर
 गायन सादर करताना सौ. मंगला हळदोणकर व इतर

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar