रथसप्तमीला करावयाचा सूर्यदेवा
रथसप्तमी साजरा करण्याची पद्धत
सूर्यनारायणाची पूजा : रांगोळीने किंवा चंदनाने पाटावर सात घोड्यांचा सूर्यनारायणाचा रथ, अरुण सारथी आणि रथात सूर्यनारायण काढतात. सूर्यनारायणाची पूजा करतात. अंगणात गोवऱ्या पेटवून त्यांवर एका बोळक्यात दूध उतू जाईपर्यंत तापवतात; म्हणजे अग्नीला समर्पण होईपर्यंत ठेवतात. त्यानंतर उर्वरित दुधाचा सर्वांना प्रसाद देतात.
मकरसंक्रांत ते रथसप्तमी या काळातील कौटुंबिक विधी : ‘सुनेचे तीळवण, जावयाचे प्रथम वाण आणि बाळाचे बोरवण करतात. या वेळी सुनेला, जावयाला आणि बाळाला हलव्याचे दागिने करतात.’
संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’