विद्याभारती संचालित पीपल्स हायस्कूल कामुर्ली येथे प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक पातळीवर आपल्या कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत व विद्यार्थ्यांनी थोरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या जीवनाची वाटचाल केली पाहिजे, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री एकनाथ वळवयकर यांनी केले. प्रजासत्ताक दिनाचे अवचित्त साधून भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रमुख पाहुणे आणि अन्य सदस्य शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी भारतमातेच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आशीर्वाद संपादन केला. सौ सुनीता मालदार हिने पाहुण्यांचे स्वागत व परिचय करून दिला तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ शिल्पा नाईक यांनी केले सौ. स्नेहा नाईक गांवकर यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.