🌹 कांदोळी श्री सिद्धिविनायक मंदिरात 🌹 श्रीगणेशजयंती महोत्सव विशेषरीत्या साजरा.
बुधवार दि. २५ जानेवारीला श्रीगणेश जयंती महोत्सव मोठ्या थाटांत पार पडला. महोत्सवाचे यजमान सौ. लेखा व सचिन प्रभाकर आरोलकर यांच्या हस्ते सकाळी श्रीगणेश पूजा, पुण्याहवाचन, श्रीअथर्वशीर्ष पाठ व श्रीगणहोम करण्यात आला. बालगणपतीची पूजा करून मूर्तिला यजमानीनी पाळण्यात घातली, सर्व भाविकानी शास्त्रोक्त ताल व स्वर बद्ध पाळणा गीते गायली, भाविकास तील-मोदकचा प्रसाद वाटला व उपस्थीत सुहासिनीची दिव्य अक्षतांनी ओटी भरली गेली.
महोत्सवास प्रमुख अतिथी म्हणून श्री सदानंद शेट तनावडे, गोवा भाजपा अध्यक्ष व इडिसी चेअरमन यांची योग्य उपस्थिती लाभली. त्यांच्याच हस्ते श्रीफळ फोडून मंदिराच्या सभामंडप प्रकल्पाचे भूमिपूजन झाले तसेच बांधकाम कंत्राटदार श्रीगुरूदास कांदोळकर व महोत्सवाचे यजमान श्री आरोलकर कुटुंबाचा सत्कार करण्यात आला.
आपल्या भाषणात श्री तानावडे यानी मंदिरातील संस्कार वर्ग, संगीत शाळा, निशुल्क भजन वर्ग व लगेच सुरु होणारी शिशुवाटीका, जुनीयर – सिनिअर के.जी. क्लास या योजनाची प्रसंशा केली व मंदिरास लाभलेल्या भक्तगणाच्या संयोगाचे कौतुक केले. कार्यक्रमास श्री गुरुदास शिरोडकर, एड. सुदेश शिरोडकर, उदय मडगांवकर, रघुभथ पाटील यांची विशेष उपस्थित होती. नंतर महामंगलारती व महाप्रसादाचा लाभ घेऊन श्री तनावडे यानी सर्वांचा निरोप घेतला.
संध्याकाळी भजन व दिपोत्सवाच्या कार्यक्रमात सुहासिनीनी विशेष भाग घेतला. महोत्सवास आर्थिक समर्पण दिलेल्या भाविकाचा व्यक्तिगत उल्लेख करून धन्यवाद व देवकृपेची प्रार्थना प्रकट करण्यांत आली. श्रीगणेश जयंती उत्सवात व दिपोत्सवात भाग घेणे कुटुंबाच्या कल्याण व प्रगतीस किती लाभवंत आहे याचे विश्लेषण अध्यक्षद्वारे देण्यात आले व त्याचबरोबर आपल्या मुलांमध्ये चांगले सनातनी संस्कार घडवायचे जरुरी असल्यास मंदिराच्या शिशुवाटीका व के.जी. शाळेत प्रवेश घेणे योग्य ठरेल असे पालकाना निवेदन करण्यांत आले.
कांदोळी श्री सिद्धिविनायक मंदिरात श्रीगणेशजयंती महोत्सव विशेषरीत्या साजरा
.
[ays_slider id=1]