विद्याभारती संचालित पीपल्स हायस्कूल कामुर्ली, श्री सातेरी विद्या मंदिर व श्री सरस्वती विद्यामंदिर

.

विद्याभारती संचालित पीपल्स हायस्कूल कामुर्ली, श्री सातेरी विद्या मंदिर व श्री सरस्वती विद्यामंदिर वाघाळी यांनी 26 जानेवारी लोकशाही दिनाच्या निमित्त कामुर्ली गावात भारत माता पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला. गावातील सहा वेगवेगळ्या वाड्यांवर भारत माता पूजनाचा नवीन उपक्रम घेण्यात आला. गावातील चिखली वाड्यावर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री प्रेमानंद मांद्रेकर व प्रमुख वक्त्या कुमारी मयुरी पाटील उपस्थित होत्या खैराट वाड्यावर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री विवेक नाईक व प्रमुख वक्ते श्री महेंद्र परब उपस्थित होते. भरवणवाडा येथे प्रमुख अतिथी श्री एकनाथ वळवयकर व प्रमुख वक्त्या कुमारी वनिता शेंमडकर उपस्थित होत्या दरबार वाडा येथे प्रमुख अतिथी श्री सगुण प्रभू तर प्रमुख वक्त्या सौ स्मिता परब व सौ स्नेहा नाईक उपस्थित होत्या तर वाघाळी येथे प्रमुख अतिथी श्री शरद गाड व प्रमुख वक्ते श्री महेंद्र परब उपस्थित होते तसेच वाघबीळ येथे श्री केदार सोमण यांच्या मातोश्री सौ लक्ष्मी सोमण प्रमुख अतिथी तर प्रमुख वक्त्या सौ सुमिता म्हालदार उपस्थित होत्या प्रत्येक वाड्यावर प्रमुख अतिथींच्या हस्ते भारत मातेच्या फोटोस हार घालून पूजन केले. भारत माते विषयी माहिती उपस्थित त्यांना सांगण्यात आली. सर्वांना अल्पहार देण्यात आला व ऋणनिर्देशनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar