शांताराम दोतोर’ यांचे निधन

.

‘शांताराम दोतोर’ यांचे निधन

देऊळवाडा – मांद्रे येथील ज्येष्ठ नागरिक तसेच प्रसिद्ध आयुर्वेदिक वैद्य श्री. शांताराम केशव शेट मांद्रेकर तथा ‘शांताराम दोतोर’ (वय ९१ ) यांचे आज रविवारी २९ जानेवारी सकाळी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
त्यांनी आयुष्यभर विविध रुग्णांची आयुर्वेदिक औषधे देऊन सेवा केली. हाड मोडणे, फ्रॅक्चर यावरही ते उपचार करायचे. गुरांसाठीची त्यांची सेवा फारच प्रसिद्ध होती. गुरांच्या कानाची नाडी पाहून ते योग्य उपचार करायचे. तसेच ‘धिरयो’च्या बैलांचे डॉक्टर म्हणून धिरयोप्रेमीत प्रसिद्ध होते. गोवा, कोकण आणि कारवारपर्यंतचे लोक त्यांच्याकडे औषधांसाठी यायचे. वेळ काळ न पाहता ते रुग्णांची सेवा करायचे. सत्तरीतील डोंगर कपार्यातून ते औषधी मुळी आणायचे. औषधांसाठी कोणतेही शुल्क न आकारता ते जे मिळेल त्यात समाधानी असायचे.
गोवा मुक्ती लढ्यावेळी पोर्तुगीजांनी त्यांना दोनवेळा अटक करून देऊळवाडा – मांद्रे येथील ‘पोस्ता’वर अटक करून दोन दिवस ठेवले होते. झेंडे आणि जाहिराती किरणपाणी येथून आल्यावर त्यांना एकदा वाटेत तर एकदा घरात कपडे खुंटीवर ठेवताना उघड्यावरून मारत कसे नेले हे ते नेहमी सांगायचे. आपण ज्याच्याकडून सत्याग्रहातील सामग्री ज्या ‘बामणा’कडून नेली होती त्याचे नाव त्यांनी पोर्तुगीजांनाच नव्हे तर घरातील कोणालाही शेवटपर्यंत कळू दिले नाही. मुक्तसंग्रामातील गुप्प माहिती ठेवण्याची शपथ मोडणार नाही, असे ते सांगायचे. एवढे असूनही अखेरपर्यंत ते पाठीवरील वळ विसरले नाहीत आणि स्वातंत्र्य सैनिक म्हणून मिरवले नाही. तसेच कोणत्याही मानधनाची त्यांनी अपेक्षा केली नाही की अर्जही केला नाही. अगदी गोवा सरकारचीही आताची कोणतीही योजना अथवा मानधन घेतले नाही. कुणी राजकारणी अर्ज घेऊन आले तरी ते त्यांनी नम्रपणे आकारले. आपण सच्चा, प्रामाणिक, स्वाभिमानी असे ते सर्वांनाच सांगायचे.
भाताच्या ‘मुडयो’ करकचीत बांधण्यात त्यांचा हातखंडा होता. अतिशय गरीब परिस्थितीतून ते पुढे स्थिरावले. शेतकरी असलेले श्री. शांताराम दोतोर चिरेखाणीवर दगड काढणे, लाकडे चिरणे, ‘पाडेली’, घरे शाकारणे, सुतारकाम असे कामधंदे ते करायचे. पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्याशी त्यांचे सख्य होते आणि ते ती गोष्ट अभिमानाने सांगायचे.
पत्रकार किशोर शेट मांद्रेकर यांचे ते वडील होत. तर अंगणवाडी सेविका सौ. सायली शेट मांद्रेकर यांचे सासरे, पोलिस खाल्यातील उपनिरीक्षक तुकाराम शेट मांद्रेकर यांचे ते काका होत. त्यांच्या पश्चात सुना, दोन मुली, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.
आयुर्वेदात निरलस सेवा बजावणाऱ्या आणि जैव संपत्तीची अचाट ओळख असलेल्या कष्टकरी अशा । ‘शांताराम दोतोर’ यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar