प्रबोधन शिक्षण संस्था संचालित प्रबोधन प्राथमिक विद्यालयात प्रजासत्ताक

.

प्रबोधन शिक्षण संस्था संचालित प्रबोधन प्राथमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पंचायतमध्ये ध्वजारोहण उपसरपंच श्री शंकर बुडे यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नास्नोळा हळदोणाचे उत्कृष्ट मूर्तिकार श्री.प्रियदर्शन साळगांवकर लाभले. माजी विद्यार्थी चि.ऋग्वेद मनोजकुमार हळर्णकर, सरपंचा श्रीमती लिओपॉल दिना ई नोरोन्हा प्रमुख अतिथी म्हणून लाभल्या होत्या.
प्रमुख पाहुणे व सरपंचा हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिशुवाटिका बालवर्ग ०२ च्या विद्यार्थ्यानी संचलन गीत सादर केले. इयत्ता चौथीतील विद्यार्थी चि.खूश सुनील हळर्णकर, विद्यार्थीनी कुमारी सृष्टी रुपेश पोरोब तसेच शिशुवाटिकेतील बालवर्ग ०२ ची विद्यार्थीनी कुमारी श्रीलेखा महाबळेश्वर भोसले हिने भाषण सादर केले. प्राथमिक विभागाच्या मुलांनी देशभक्ती गीत म्हटले व कवायत प्रकार सादर करून सर्वांची शाबासकी मिळवली. पूर्व प्राथमिक मुलांनी देशभक्तांची वेशभुषा करून फॅशन शो चे सादरीकरण केले व सर्वांच्या कौतुकास पात्र ठरले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्वागत शिक्षिका सौ. स्वेजा शेखर मांद्रेकरने केले. पाहुण्यांचा परिचय शिक्षिका सौ.सुनंदा गिरीष मसूरकर ने केला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिक्षिका कु.रेषा सावंत ने केले. खाऊ वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रमाला माजी सरपंच व हळदोणा मतदार संघ भाजपचे अध्यक्ष श्री विनय चोपडेकर, पंच सदस्य श्री. सूर्या हडफडकर, समीर चोडणकर, श्री गोकुळदास हळर्णकर, सोनिया चोडणकर उपस्थित होते.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar