प्रबोधन शिक्षण संस्था संचालित प्रबोधन प्राथमिक विद्यालयात हळदी कुंकूचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

.

प्रबोधन शिक्षण संस्था संचालित प्रबोधन प्राथमिक विद्यालयात हळदी कुंकूचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सौ. वंदिता कोटकर उपस्थित होत्या. दीपप्रज्वलनानंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रमुख पाहुण्या सौ वंदिता कोटकर हिने मधुमेह, थाइरॉइड, यूरिक एसिड रोगांबद्दल पालकांना माहिती दिली तसेच आपला आहार कसा असावा? पाणी किती प्यावे? याबद्दल मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुण्याद्वारे मार्गदर्शनानंतर महिला पालकांसाठी प्रश्न मंजुषा व मनोरंजनात्मक खेळ उदाहरणात स्मरण शक्ती व अंकांचा खेळ घेण्यात आला. अंकांच्या खेळामध्ये प्रथम – सौ. प्रजिया कलशावकर, द्वितीय – सौ. जानवी साळगावकर यांना बक्षीस मिळाले. तर स्मरणशक्तीच्या खेळात प्रथम- सौ. जानवी साळगावकर व सुरभी हळर्णकर, द्वितीय- रितीशा वळवईकर व रेश्मा हळदोणकर यांना बक्षीसे मिळाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्वागत शिक्षिका कु. रेषा सावंत हिने केले. दिनाचे महत्व सुनंदा गिरीष मसूरकर बाईने सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. स्वेजा शेखर मांद्रेकर हिने केले. हळदी कुंकू झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar