अलीकडच्या पत्रकारितेत बनावट बातम्यांचे पेव वाढले असून त्याची सत्यता वृत्तपत्रांतील बातम्यांवर अवलंबून असते.त्यामुळे पत्रकारिता क्षेत्रात वावरताना जोखीम,सत्यता व पारदर्शकता सांभाळल्यास हितसंबंध चांगले टिकून राहू शकतील.पत्रकाराची लेखणी ताकदवान असते,ती विकली जाणार नाही, ह्याची काळजी हवी असे प्रतिपादन कुमायू रेजिमेंटचे आयजीपी निलेश आनंद भरणे यांनी केले.

.

हरमल प्रतिनिधी

अलीकडच्या पत्रकारितेत बनावट बातम्यांचे पेव वाढले असून त्याची सत्यता वृत्तपत्रांतील बातम्यांवर अवलंबून असते.त्यामुळे पत्रकारिता क्षेत्रात वावरताना जोखीम,सत्यता व पारदर्शकता सांभाळल्यास हितसंबंध चांगले टिकून राहू शकतील.पत्रकाराची लेखणी ताकदवान असते,ती विकली जाणार नाही, ह्याची काळजी हवी असे प्रतिपादन कुमायू रेजिमेंटचे आयजीपी निलेश आनंद भरणे यांनी केले.

सितारगंज उत्तराखंड येथे महाराज अग्रसेन धर्मांध ट्रस्टच्या सभागृहात, इंडियन फेडरेशन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट व राज्य असोसिएशनच्या दोन दिवसीय अधिवेशनात समारोप कार्यक्रमात बोलत होते.आजही घटक वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा  स्तंभ मानला जातो.त्यानुरूप पत्रकाराने प्रत्येक बातमीच्या अनुषंगाने माहिती मिळवली पाहिजे व त्यानंतरच विस्तृतपणे वाचकांपर्यंत पोचवली पाहिजे.’फेक’ बातम्यांचा सुकाळ वाढल्याने वृत्तपत्र पत्रकारांना सजग व निडर बनून वागणे क्रमप्राप्त झाले आहे.आमच्या पोलिस सेवेत,एखाद्या घटनेबाबत काय व किती बोलावे ह्याचे शिक्षण मार्गदर्शनातून दिले जाते.त्यातुन पोलीसविषयी शिस्त,तपास व जनतेला आश्वस्त करणारी बातमी खरी गरज असते,असे सांगून पोलिस व पत्रकार ह्याचे नाते मजबूत व एकामेकावर अवलंबून असते,असे आयजीपी भरणे यांनी व्यक्त केले.उद्यमसिंग नगरचे जिल्हाधिकारी जुगल किशोर पंत यांनी फेडरेशन च्या कार्याचे कौतुक केले व मागण्याचे निवेदन देत प्रशासकीय अधिकारी व मंत्रीपातळीवर नेण्याचे आश्वासन दिले.यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष अवधेश भार्गव,उत्तराखंडचे राज्य अध्यक्ष शंकर शर्मा,राष्ट्रीय किसान आयोगाचे राजपाल सिंग,अल्पसंख्याक आयोगाचे इकबाल सिंह,बिहार प्रेसचे अध्यक्ष अनमोल कुमार,सचिव प्रभात कुमार,मध्यप्रदेश राजेंद्र जोशी,राजस्थान हरीश गुप्ता,दिल्लीचे इमरान,गोवा भारत बेतकेकर,राज्य महासचिव मधु बिशत सहित 12 राज्यातील पत्रकार अध्यक्ष उपस्थित होते.यावेळी राज्य महामंत्री तथा अनुशासन समिती अध्यक्ष गणेश सालगनी यांनीं प्रास्ताविक व आभार मानले.

फोटो
सितारगंज—इंडियन फेडरेशन ऑफ वर्कींग जर्नालिस्टच्या अधिवेशनात आईजीपी निलेश भरणे,सोबत जिल्हाधिकारी जुगल पंत,राष्ट्रिय अध्यक्ष अवढेश भार्गव,राज्य अध्यक्ष शंकर शर्मा,गोवा अध्यक्ष भारत बेतकेकर यांचा गौरव करताना दिसत आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar