गोव्यात प्रथमच- मणिपाल हॉस्पिटल्स गोवा ने केल्या २४ तासात दोन यशस्वी अवयवबदल शस्त्रक्रिया*

.

*गोव्यात प्रथमच- मणिपाल हॉस्पिटल्स गोवा ने केल्या २४ तासात दोन यशस्वी अवयवबदल शस्त्रक्रिया*

मणिपाल हॉस्पिटल्स, गोव्यातील डॉक्टरांनी यशस्वीपणे दोन अतिशय धोकादायक अशा अवयवबदल शस्त्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. यांतील एक शस्त्रक्रिया म्हणजेच जोडीदाराने ‍दिलेल्या किडनीचे रोपण आणि दुसरी म्हणजे ॲलोजेनिक बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट शस्त्रक्रिया होय. गोव्यातील मणिपाल हॉस्पिटल हे एकमेव असे किडनी आणि बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट अशा दोन्ही शस्त्रक्रिया करणारे आणि लॅपारोस्कोपिक बोन मॅरो रिट्रायव्हल करणारे गोव्यातील पहिले हॉस्पिटल ठरले आहे.

५५ वर्षीय महिलेला बायलॅटरल पीसीकेडी चा त्रास हाता आणि खूप मोठ्या प्रमाणावर इन्फेक्शन झाल्या मुळे बायलॅटरल नेफ्रॉक्टॉमीची गरज होती. त्याच बरोबर त्या महिलेला युरेमिक कार्डिओमायोपॅथी चा त्रास ही होता. त्यामुळे त्या महिलेला ॲनुरिया, श्वास लागणे आणि डायलिसिस करावे लागत होते. या सर्व आव्हानांचा मुकाबला करत त्यांची किडनी बदल यशस्वीपणे आणि सुरक्षितपणे करता आली. हे सर्व किडनी ट्रान्सप्लान्ट टिम मुळे शक्य झाले या टिम मध्ये डॉ. दिपक दुबे, डॉ. अमोल महालदार, डॉ. माधव संझगिरी, डॉ. राकेश देशमाने, डॉ. जगन्नाथ कुलकर्णी, डॉ. दिव्या महालदार, डॉ. योगेश गाऊडे आणि डॉ. एलेन रॉड्रीग्ज यांचा समावेश आहे.

या रुग्णाविषयी अधिक माहिती देतांना मणिपाल हॉस्पिटल्स,गोव्याचे कन्सल्टंट युरोलॉजिस्ट डॉ. माधव संझगिरी यांनी सांगितले “ या महिलेच्या किडनीज काढल्या होत्या आणि त्यांना लवकरात लवकर बदलणे आवश्यक होते. पण या महिलेला हृदयाचा त्रास होता, कमी हिमोग्लोबिन आणि कमी रक्तदाबाचा त्रास असल्याने डायलिसिस मध्ये सुध्दा त्रास होत असे. त्यांच्या जीवनावर याचा खूपच घातक परिणाम होऊ लागला होता त्यामुळे एका गृहिणी पासून आता त्यांना कोणावर तरी अवलंबून रहावे लागत असे. त्यांची किडनी बदलल्या मुळेच लाभ होऊ शकत होता आणि याकरता कोणीतरी किडनी दाता मिळणे आवश्यक होते. आम्ही त्यांच्या कुटूंबात चौकशी केल्यावर लक्षात आले की त्यांचे पती किडनी देऊ शकतात. खरे पाहता किडनी बदल करतांना रक्तगट मिळणे आवश्यक असते कारण एका प्रकारच्या रक्तातील ॲन्टीबॉडीज दुसर्‍या ब्लड ग्रुपच्या विरोधात काम करत असतात.”

ऑपरेशन पूर्वी रुग्णाची संपूर्ण चाचणी केल्यानंतर असे दिसून आले की यात आणखी काही आव्हाने समोर आहेत. जरी हृदयाशी संबंधित रक्तवाहिनी काम करत असली तरीही हृदयाचे कार्य हे केवळ ३५ टक्के होते. यामुळे युरेमिया म्हणजेच ‘रुग्णाच्या शरीरातील वाईट परिस्थिती मुळे किडनी खराब होणे’ अशी स्थिती होती. नीट व्यायाम करता येत नसल्यामुळे रुग्णाला ट्रान्सप्लान्टच्या वेळेस ॲनेस्थेशिया देण्याचा ही धोका होता.किडनी काढून टाकण्याची शस्त्रक्रिया आणि पोटावर भोक असल्यामुळे टिम साठी अधिकच किचकट प्रक्रिया होती. एक वर्षापासून लघवी नसल्यामुळे मूत्राशय छोटे होते आणि अवयव रोपणाचा कालावधी खूपच अधिक असल्या कारणाने त्यांत इन्फेक्शन होण्याची शक्यता ही अधिक प्रमाणात होती. असे कन्सल्टंट नेफ्रॉलॉजी आणि ट्रान्सप्लान्ट फिजिशियन डॉ. अमोल महालदार यांनी सांगितले.

बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट केस बद्दल माहिती देतांना मणिपाल हॉस्पिटल्स गोवा चे कन्सल्टंट हेमॅटो ऑन्कोलॉजिस्ट आणि बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट फिजिशियन डॉ. महादेव स्वामी यांनी सांगितले “ अतिशय धोकादायक अशा केस मध्ये मायलोजेनस ल्युकेमिया असलेल्या एका रुग्णाला इंडक्शन केमोथेरपी ची गरज होती. त्या रुग्णाला अतिशय कठीण अशा केमोथेरपीच्या उपचारांनंतर आणण्यात आले होते. अशा प्रकारच्या जटील रेफ्रॅक्टरी ल्युकेमिया मध्ये आजारात ह्युमन ल्युकोसाईट ॲन्टीजेन (एचएलए) बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट मध्ये मॅच होणे आवश्यक असते. पण दुर्दैवाने कोणतेच एचएलए उपलब्ध नव्हते आणि रुग्णाला संबंध नसलेल्या दात्याचे म्हणजेच राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय रजिस्ट्रीतील दात्याचे एचएलए परवडणारे नव्हते. रुग्णाच्या मुलाचे हॅप्लो एचएले (अर्धे) मॅच होत होते.”

रुग्णावर हाफ मॅच बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट शस्त्रक्रिया करण्यात आली. या उपचारांदरम्यान रुग्णामध्ये फायब्राईल न्युट्रोपेनिया सह सेप्सीस आणि खूपच मोठ्या प्रमाणावर म्युकोसायटिस चा त्रास झाला पण योग्य ॲन्टीबायोटिक्स आणि अन्य उपचारांमु
ळे यावर नियंत्रण मिळाले.

रुग्णाला विविध प्रकारच्या रक्ताची ही गरज होती विशेष करुन इररेडिएटेड ब्लड उत्पादने. रुग्णाच्या मुलाच्या स्टेम सेलचा वापर केल्या मुळे त्याच्या न्युट्रोपेनिया आणि सेप्सीस मध्ये सुधारणा झाली. हा आजार ग्रेड १ जीव्हीएच (ग्राफ्ट व्हर्सेस होस्ट डिसीज) झाला पण त्याचे व्यवस्थापन इम्युनोसप्रेसंट आणि त्यानंतर ३१ ‍दिवस हॉस्पिटल मध्ये ठेऊन रुग्णाला घरी सोडण्यात आले. या जटील बीएमटी ट्रान्सप्लान्ट ची शस्त्रक्रिया ही जवळजवळ एकसाथ आणि अजोड अशा टिमवर्क ने करण्यात आली. या टिम मध्ये मणिपाल हॉस्पिटल्स गोव्याचे कन्सल्टंट हेमॅटो ऑन्कोलॉजिस्ट डॉ. महादेव स्वामी, मणिपाल हॉस्पिटल्स गोव्यातील कन्सल्टंट ट्रान्सफ्युजन मेडिसिन आणि ब्लड बँकेचे प्रमुख डॉ. धवल फडाडू तसेच आयसीयू तील डॉक्टर्स , नर्सेस आणि अन्य कर्मचार्‍यांसह डॉ. सिध्देश यांचा समावेश होता.

डॉ.महादेव स्वामी यांनी सांगितले “ गोव्यात प्रथमच अशा प्रकारच्या जटील आणि कठीण अवयबदल शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्या. यासाठी सर्वाधिक वाहून घेण्याची क्षमता आणि तज्ञांचे टिमवर्क आवश्यक होते, त्याच बरोबर उच्च तंत्रज्ञानासह अगदी छोट्या म्हणजेच २४ तासांमध्ये हे काम करण्याची क्षमता असणे आवश्यक होते. सध्या दोन्ही रुग्ण घरी सुरक्षित आणि स्थीर असून ते त्यांचे नियमित काम करत आहेत.”

या दोन्ही यशस्वी उपचारां बद्दल माहिती देतांना मणिपाल हॉस्पिटल्स गोव्याचे हॉस्पिटल डायरेक्टर श्री सुरेंद्र प्रसाद यांनी सांगितले “ या केसेस खूपच दुर्मिळ असतात आणि मणिपाल हॉस्पिटल्स गोवा नेहमीच भविष्यातही असेच कष्ट घेऊन अनेकांचे जीव वाचवणार आहे. मी निदाना पासून ते उपचार करणार्‍या सर्व टिमचे अभिनंदन करतो आणि दोन रुग्णांना चांगल्या गुणवत्तेचे जीवन दिल्याबद्दल त्यांचे कौतुक करतो. दोन्ही रुग्ण हे चांगले असून त्यांच्या जीवनाची गुणवत्ता अधिक सुधारली आहे.”

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar