*‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘तणावमुक्त जीवन कसे जगावे’ या विषयावर मार्गदर्शन*
_*कोरगाव, पेडणे येथील श्री कमळेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी उपक्रम*_
पेडणे, ३१ जानेवारी – ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने कोरगाव, पेडणे येथील श्री कमळेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता ११ वी आणि १२ वीतील विद्यार्थ्यांसाठी ‘तणावमुक्त जीवन कसे जगावे’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय न्यासा’चे श्री. संगम बोरकर यांनी हे मागदर्शन केले.
या वेळी मार्गदर्शनात ‘आपल्या जीवनात तणाव कसा निर्माण होतो?’, ‘तणावाचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो?’, ‘तणावावर कशी मात करावी?’, ‘जीवनात छोट्या छोट्या प्रसंगात निर्माण होत असलेला तणावावर सोप्या पद्धतीने आणि अध्यात्माची जोड देऊन कशी मात करता येते?’, ‘आपले मन कसे कार्य करते?, ‘मनातील अनावश्यक आणि निरर्थक विचार नामस्मरणाद्वारे कसे अल्प होऊ शकतात?’, ईश्वरी गुण अंगी आणल्याने होणारे लाभ यांविषयी माहिती देण्यात आली. मागदर्शनाच्या अखेर तणाव अल्प करण्यासाठी काही प्रात्यक्षिके घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने विषय समजून घेतला आणि शेवटी मनोगत व्यक्त केले. या उपक्रमाचा १८० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कमळेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक श्री. प्रशांत रासईकर यांनी केले, तर विद्यालयाच्या प्राचार्य सौ. जुही थळी यांनी आभारप्रदर्शन केले. श्री कमळेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाचे सचिव श्री. जयेश थळी यांनी या वेळी प्रवचनात सांगितलेल्या सूत्रांचे आचरण करून तणावमुक्त जीवन कसे जगण्यासाठी प्रयत्न करावे असे विद्यार्थ्यांना आवाहन केले. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने हा विषय यापुढेही विद्यार्थ्यांसाठी घ्यावा, अशी मागणी या वेळी घेण्यात आली.
आपका नम्र,
*श्री. आशिष सावंत,*
संशोधन विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय,
(संपर्क : 9561574972)