गोव्यातील स्थानिक व्यावसायिक काळाच्या ओघात लुप्त होत आहेत, पेडण्यातील कुशल गवंडी, बार्देशातील सुतार, लोहार, न्हावी, कासार हे स्थानिक कलाकार शोधूनही सापडत नाहीत, अशावेळी रोटरी क्लब ऑफ

.

गोव्यातील स्थानिक व्यावसायिक काळाच्या ओघात लुप्त होत आहेत, पेडण्यातील कुशल गवंडी, बार्देशातील सुतार, लोहार, न्हावी, कासार हे स्थानिक कलाकार शोधूनही सापडत नाहीत, अशावेळी रोटरी क्लब ऑफ म्हापसाने विविध व्यवसायातील आठ व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे ही प्रशंसनीय गोष्ट आहे.म्हापसा रोटरी क्लब ने गोव्यातील अशा व्यावसायिक व्यक्तींसाठी कार्यशाळा आयोजित करून त्यांना प्रोत्साहित करावे असे आवाहन उद्योजक गुरुदत्त भक्ता यांनी केले.
म्हापसा रोटरी क्लब आयोजित विविध क्षेत्रातील व्यावसायिकांच्या सत्कार सोहळ्यात प्रमुख अतिथी या नात्याने गुरुदत्त भक्ता बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष दीपेश मकाडिया, सचिव निखिलचंद्र खलप व खजिनदार रोहित नाटेकर उपस्थित होते.
या कार्यक्रमात श्रीमती रुक्मिणी गोवेकर (फुलवाली), उल्हास बर्डे ( शेतकरी), पांडुरंग देसाई (फ्रुट सलाड विक्रेता ),आनंद नाईक (अग्निशामक दल जवान), श्रीमती जेनिफर फर्नांडिस( ब्युटीशियन) ज्ञानेश्वर आश्वेकर (गवंडी), नरेंद्र गोंधळी (पोलीस) व नारायण राटवड (पत्रकार व शिक्षक )यांच्या कार्याचा गौरव करून शाल, श्रीफळ,भेटवस्तू व स्मृतीचिन्ह प्रदान करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
सुरुवातीस अध्यक्ष दीपेश माकाडिया यांनी स्वागत केले, ऍड. अवधूत सलत्री यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.वेदा थळी यांनी सत्कार मूर्तींचा परिचय केला,सचिव निखिलचंद्र खलप यांनी आभार मानले. सत्कार मूर्तीच्या वतीने ज्ञानेश्वर गवंडी, नारायण राटवड व आनंद नाईक यांनी विचार मांडले.

गृह मालेतील सूर्य हा ऊर्जेचा प्रचंड स्त्रोत आहे. त्याच्या प्रकाशाने जग उजळून निघते, त्या सूर्याची उपासना करून त्यास कृतज्ञ पूर्वक नमन करणे ही आमची परंपरा आहे. रथसप्तमीचे औचित्य साधून सूर्यप्रकाशात सामूहिक सूर्य नमस्कार घालण्याचा भारतीय योग विद्या धाम चा संकल्प प्रशासनीय आहे. प्रत्येक व्यक्तीने रोज किमान 12 ते 14 सूर्यनमस्कार घातल्यास शरीर सुदृढ आणि निरोगी राहील असे प्रतिपादन योग अभ्यासक व पद्मश्री ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींचे शिष्य अनिल नार्वेकर यांनी केले.
येथील डॉ. राम मनोहर लोहिया उद्यानात 23 व्या वर्षी रथसप्तमी प्रत्यय सामूहिक सूर्यनमस्कारांच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी या नात्याने बोलत होते भारतीय योग विद्याधाम म्हापसा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, म्हापसा व भारत माता की जय या संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामूहिक सूर्यनमस्कारांचा कार्यक्रम संपन्न झाला.
सुरुवातीस प्रमुख पाहुणे व इतरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले, ओमकार प्रतिमेचे पूजनही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. योग शिकू अन शिकवूया,मज नको औषधे योग हवा. या योगितांनी प्रारंभ करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुण्यांसोबत भाई पंडित कमलाकांत वांगणकर नारायण राटवड, देविदास कारेकर, मनोहर बुज्जी, मोहिनी पडते व वंदना आजगावकर उपस्थित होते.
योग शिक्षक नारायण राटवड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, मोहिनी पडते यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, मनोहर बुज्जी यांनी वर्ग घेतला, देविदास काररेकर यांनी सूर्य मंत्र म्हटला, अनिल सामंत यांनी सूत्रसंचालन केले,,श्याम वांगणकर यांनी योग पसायदान सादर केले तर कमलाकांत वायंगणकर यांनी आभार प्रदर्शन केले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar