जीएफडीसीच्या प्रशिक्षक कार्यशाळेची सांगता थिवी नवा गोवा फुटबॉल विकास परिषदेने (जीएफडीसी) प्रशिक्षकांसाठीच्या दोन कार्यशाळांचे यशस्वीरित्या आयोजन

.
जीएफडीसीच्या प्रशिक्षक कार्यशाळेची सांगता
थिवी नवा गोवा फुटबॉल विकास परिषदेने (जीएफडीसी) प्रशिक्षकांसाठीच्या दोन कार्यशाळांचे यशस्वीरित्या आयोजन केले आहे. दोन्ही जिल्ह्यांत प्रत्येकी एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षणार्थींना सामना संबंधित प्रशिक्षण सत्रांमध्ये ज्ञान देण्यासाठी प्रशिक्षकांना अद्ययावत करणे हा या मागील प्रमुख उद्देश होता.
उत्तर गोव्यातील प्रशिक्षकांसाटी किटला येथे स्थित जीएफडीसीच्या हळदोणा केंद्रावर २४ व २५ जानेवारी रोजी झाली. दक्षिण गोव्यातील प्रशिक्षकांसाठी ३० व ३१ रोजी फातोर्डा क्रीडा संकुलातील आर्टिफिशियल टर्फ येथे झाली. सकाळी ९ ते संध्याकाळी ६ ही कार्यशाळेची वेळ होती. संपूर्ण गोव्यातून मिळून एकूण ७० प्रशिक्षकांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.
जीएफडीसीचे अध्यक्ष ब्रह्मानंद शंखवाळकर यांनी चार दिवसीय या कार्यशाळेत दोन्ही ठिकाणांना भेट दिली. भारताचे गोलरक्षक प्रशिक्षक तसेच प्रशिक्षणात एएफसीचे ‘अ’ प्रमाणपत्रधारी मारियो आगियार यांच्या मार्गदर्शनाखाली नाविन्यपूर्ण पद्धतीने ही कार्यशाळा संपन्न झाली.
जीएफडीसी प्रशिक्षणार्थींना सामना संबंधित सत्रांमध्ये उपयोग व्हावा यासाठी प्रशिक्षकांचे ज्ञान वाढावे हा या कार्यशाळा आयोजनामागील उद्देश होता. वॉल पासवर लक्ष केंद्रीत करताना जोडीने खेळ करणे, ओव्हरलॅप व टेकओव्हर असे विषय होते. यात प्रात्यक्षिके तसेच सैद्धांतिक सत्रांचा समावेश होता. विविध गटातील मुलांना कसे हाताळायचे यासंबंधी विचारमंधनाचे सत्र तसेच कृती सत्रांचा देखील यात समावेश होता.
प्रशिक्षकांचे शिक्षण ही यशाची चावी असून चांगले प्रशिक्षक चांगले खेळाडू घडवतात असे म्हटले जाते. ही कार्यशाळा मूल्यमापन करणारी तसेच प्रात्यक्षिकांची कार्यशाळा होती. यात ८ ते १० वयोगटासाठी ड्रिबलिंग व चेंडूवर नियंत्रण तसेच १० ते १२ वर्षे वयोगटासाठी पास व साहाय्यक खेळ कसा करावा याचे शिक्षण प्रशिक्षकांना देण्यात आले, असे एएफसी अ प्रमाणपत्रधारी मार्गदर्शक मारियो यांनी सांगितले.
पहिल्या टच्‌चा दर्जा, बचावात्मक खेळ, चार बाय चार आक्रमक खेळ, गोलरक्षकाने चेंडू कसा अडवावा, कसा रोखावा, प्रशिक्षकांची जबाबदारी व त्यांची भूमिका या बद्दल त्यांना ज्ञान दिले, असे मारियो यांनी सांगितले.
दीर्घकाळानंतर ही कार्यशाळा होत असल्याने याद्वारे प्रशिक्षकांचे ज्ञान अद्ययावत होऊन ते ताजेतवाने होतील, असा विश्‍वास जीएफडीसी अध्यक्षांनी व्यक्त केला.
युवा खेळाडूंना प्रशिक्षक देताना त्यांचा मित्र बनून तसेच व्यावसायिक दृष्टी ठेवून त्यांना प्रशिक्षण देण्याचा सल्ला मी प्रशिक्षकांना देतो. सदर कार्यशाळेत आपले अमूल्य ज्ञान प्रशिक्षकांंना दिल्याबद्दल मी मारियो यांचे मी आभार मानतो, असे जीएफडीसी अध्यक्षांनी सांगितले.
या कार्यशाळेद्वारे मिळालेल्या ज्ञानातून प्रशिक्षकांनी नवीन स्फुरण चढले असून त्यांचा उत्साह द्विगुणीत झाला

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar