नॅशनल क्लब ऑफ विवाचे राष्ट्रीय चेअरमन उदयन कुलक्षेत्र यांनी क्लबच्या कार्याचा विस्तार सुंदर व निसर्गसंपन्न गोव्यात करण्याच्या दृष्टीने पावले उचलली असून,त्याबाबत नुकतीच महत्वपूर्ण बैठक ताज हॉटेल दिल्लीत

.

हरमल वार्ताहर

दि नॅशनल क्लब ऑफ विवाचे राष्ट्रीय चेअरमन उदयन कुलक्षेत्र यांनी क्लबच्या कार्याचा विस्तार सुंदर व निसर्गसंपन्न गोव्यात करण्याच्या दृष्टीने पावले उचलली असून,त्याबाबत नुकतीच महत्वपूर्ण बैठक ताज हॉटेल दिल्लीत संपन्न झाली.

ह्या बैठकीत गोवा प्रांताचे भारत बेतकेकर व चंद्रहास दाभोलकरव अन्य सदस्यांनी भाग घेतला व सविस्तर चर्चा केली.या क्लबच्या कार्याचा विस्तार करण्याच्या दृष्टीने श्री कुलक्षेत्र यांनी चाचपणी केली.ह्या क्लबच्या मार्फत गोव्यात भेटी देणाऱ्या क्लबचे सदस्य तसेच हितचिंतकाना अतिसुंदर व अत्यंत विलासीत सुटमध्ये वास्तव्य व अन्य सुविधा पुरवण्याचा प्रयत्न क्लबतर्फे करण्यात येईल, असे चेअरमन कुलक्षेत्र यांनी सांगितले.

ह्या क्लबच्या माध्यमातून कर्तव्य भावना विकसित करावी तसेच उपेक्षित घटकांना आवश्यक सहाय्य व गरजवंत लोकांना मदतीचा हात देऊन त्याचे जीवनमान उंचावण्यासाठी शक्य तितका प्रयत्न राहील असे चेअरमन कुलक्षेत्र यांनी गोवा प्रांतीय पदाधिकाऱ्यांना सांगितले.आगामी महिन्यात क्लबचे कार्य प्रत्यक्षरित्या चालू करण्याचा मनोदय असल्याचे चेअरमन कुलक्षेत्र यांनी व्यक्त केले.

फोटो
दिल्ली–ताज हॉटेलमध्ये बैठकीत सहभागी चेअरमन उदयन कुलक्षेत्र सोबत भारत बेतकेकर व चंद्रहास दाभोलकर

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar