मणिपाला हॉस्पिटल गोवा तर्फे जागतिक कर्करोग दिन साजरा*

.

*मणिपाला हॉस्पिटल गोवा तर्फे जागतिक कर्करोग दिन साजरा*

*गोवा, ४ फेब्रुवारी २०२३:* मणिपाल हॉस्पिटल्स गोवा या भारतातील आघाडीच्या आरोग्य सेवा प्रदात्यां कडून जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून हॉस्पिटल च्या आवारात आयोजित एका समारंभात उत्तर गोव्याचे पोलिस अधिक्षक श्री निधीन वाल्सन यांच्या हस्ते कॅन्सरशी यशस्वी लढा दिलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये मणिपाल हॉस्पिटल्स गोव्याचे हॉस्पिटल डायरेक्टर श्री. सुरेंद्र प्रसाद, मणिपाल हॉस्पिटल्स गोव्याचे सिनियर कन्सल्टंट ऑन्कोलॉजी सर्जन डॉ. शेखर सालकर, मणिपाल हॉस्पिटल्स गोव्याचे कन्सल्टंट मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. जेकब जॉर्ज, मणिपाल हॉस्पिटल्स गोव्याच्या कन्सल्टंट रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट डॉ. गुंजन बैजल, मणिपाल हॉस्पिटल्स गोव्या चे कन्सल्टंट हेमॅटोलॉजिस्ट डॉ. महादेव बी सी , मणिपाल हॉस्पिटल्स गोव्याचे ऑन्कोलॉजी सर्जन डॉ. श्रीधरन्, मणिपाल हॉस्पिटल्स गोव्याचे मेडिकल सुप्रिंटेंडंट डॉ. आदित्य गोसावी तसेच मणिपाल हॉस्पिटल्स गोव्याचे सेल्स आणि मार्केटिंग विभागाचे प्रमुख श्री हरी प्रसाद इत्यादींचा समावेश होता.

अलिकडच्या काळात भारतात असे दिसून आले आहे की वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, जीवनशैलीतील बदल आणि वाढत्या लोकसंख्ये मुळे कर्करोगाचे रुग्णही वाढू लागले आहेत. दुर्दैवाची गोष्ट अशी की यांतील ७० टक्क्यांहून अधिक केसेस चे निदान हे आजारच्या अगदी पुढच्या टप्प्यात होतांना दिसते, यामुळे वाचण्याची शक्यता खूपच कमी असते. जर लवकर निदान झाले आणि पर्यायी उपचार पध्दती प्राप्त झाली तर भारतात वाचणार्‍या रुग्णांची संख्या वाढू शकेल.

यावेळी बोलतांना *मणिपाल हॉस्पिटल्स गोव्याचे हॉस्पिटल डायरेक्टर श्री. सुरेंद्र प्रसाद* यांनी सांगितले “ जागतिक कर्करोग दिन २०२२-२०२४ चा विषय म्हणजे ‘क्लोज केअर गॅप’ असा आहे. उपचारांमधील दरी ही केवळ एकत्र येऊन आणि काम करुन तसेच सर्व घटक हे सर्वांसाठी उपलब्ध होऊन प्रत्येकाला योग्य उपचार मिळणे आवश्यक आहे. जागतिक कर्करोग दिन हा एकमेव असा उपक्रम आहे ज्यामध्ये संपूर्ण जग एकत्र येऊन कर्करोगाशी मुकाबला करत असते. या उपक्रमाच्या माध्यमातून मणिपाल हॉस्पिटल्स गोवा कडून लोकांमध्ये विविध प्रकारच्या कर्करोगांबाबत जागरुकता ‍निर्माण करत कशा प्रकारे कोणता कर्करोग योग्य लसींमुळे आणि जीवनशैलीतील बदलांमुळे थांबवता येऊ शकतो याची माहिती देत आहोत.”

मणिपाल हॉस्पिटल्स गोव्याचे कन्सल्टिंग ऑन्कोलॉजी सर्जन डॉ. शेखर सालकर यांनी सांगितले “ मणिपाल हॉस्पिटल्स गोव्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही कर्करोगाशी लढा जिंकलेल्या लोकां बरोबर हा दिन साजरा करत आहोत आणि त्याच बरोबर ज्यांचे निदान झाले आहे अशांना त्यांच्या परिवारासोबत लढण्यासाठी प्रोत्साहन देत आहोत. या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही रुग्ण, त्यांचे परिवार आणि समाजामध्ये कर्करोगाचा प्रतिबंध, उपचार आणि विविध पर्यायांबाबत माहिती देत आहोत. हा उपक्रम म्हणजे लोकांमध्ये कर्करोगाचे लवकर निदान करणे, त्याचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे आणि कर्करोगाच्या रुग्णांना सहकार्य करून लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे आणि त्याच बरोबर त्यांना योग्य वेळेत निदान करुन उपचार करण्याचे महत्त्व समजावून सांगण्याच्या मणिपाल हॉस्पिटल्सच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.”

यावेळी बोलतांना उत्तर गोव्याचे पोलिस अधिक्षक श्री निधीन वाल्सन यांनी सांगितले “ मेडिकल ऑन्कोलॉजी, रेडिएशन ऑन्कोलॉजी आणि सर्जिकल ऑन्कोलॉजी क्षेत्रातील तंत्रज्ञानातील अधुनिकते मुळे आजमितीला अधिकतर प्रकारचे कर्करोग हे बरे होत आहेत. अनेक प्रकारच्या कर्करोगाच्य उपचारांमध्ये नवीन तंत्रज्ञान खूप महत्त्वाची भूमिका अदा करत आहे. मला आनंद आहे की मणिपाल हॉस्पिटल्स गोवा लोकांमध्ये जागरुकता ‍निर्माण करत असून त्याच बरोबर कर्करोगातून मुक्त झालेल्या लोकांमधील जगण्याची इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाचा ते गौरव करत आहेत.”

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar