*कोक स्टुडिओ भारत नवीन व्हॉइस ऑफ इंडिया साजरा करत आहे*
जागतिक स्तरावर कोक स्टुडिओच्या जबरदस्त यशानंतर, कोका-कोलाने आज मुंबईत ‘कोक स्टुडिओ भारत’ लॉन्च करण्याची घोषणा केली. हा सीझन देशभरातील ५० हून अधिक कलाकारांचे एकत्रीकरण आहे ज्यांनी भारताच्या संस्कृतीचा उत्सव साजरा करणारे 10 हून अधिक संस्मरणीय ट्रॅक तयार केले आहेत.
भारतीय संगीत उद्योगात क्रांती होत आहे आणि जनरल झेड हे बदल घडवून आणत आहेत. आज, युवक सत्यता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि अनोखे, वैविध्यपूर्ण, तरीही अर्थपूर्ण अशा विविध संगीत प्रकारांमध्ये नवनवीन प्रयोग करताना दिसून येत आहेत.
कोक स्टुडिओच्या या सीझनमध्ये त्यांचा स्वतःचा अनोखा आवाज ट्रॅकला देण्यासाठी भारतातील दुर्गम भागातील उदयोन्मुख कलाकार आणि अनुभवी कलाकार एकत्र आले आहेत.
कोक स्टुडिओ भारत: ‘अपना सुनाओ’ हा प्रतिभावान कलाकारांचा अनोख्या कार्यक्रम उदयोन्मुख आवाजांना भारताची कथा सांगण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करते. संस्कृतीत रुजलेली असूनही हे कलाकार आधुनिक व नवीन संगीत स्वीकारत असल्याचे दिसत आहे. हे व्यासपीठ भारताच्या विविध भागांना आदरांजली वाहणारे संगीत होस्ट करेल, इतिहासात समृद्ध असलेल्या कथांशी, वैविध्यपूर्ण भाषांशी जोडलेले आणि विविध वाद्ये वापरून तयार केलेल्या सुमधुर संगीताची मेजवानी या कार्यक्रमाद्वारे मिळणार आहे.
आज, भारतीय कलाकार त्यांच्या प्रदेशाच्या कथा अभिमानाने सांगत आहेत, अशा आवाजात जे केवळ अस्सल आणि खरोखरच प्रादेशिक असला तरी जगभरातील चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. ‘अपना सुनाओ’ नव्या भारताच्या भावनेला संबोधित करतो. हा कार्यक्रम भारताच्या अस्सलपणा व लोकशाहीच्या मूल्यांना प्रदर्शित करतो.