म्हापसा वाताहार जायंट्स गृप आॅफ थिवी व दंत महाविद्यालय बांबोळी यांच्या संयुक्त विद्यमाने पिर्ण येथील शांतादुर्गा विद्यालयात दंत चिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचे उदघाटन दंत महाविद्यालय च्या डॉ. फिलोन डिकोसता यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जायंट्स गृप आॅफ थिवी चे अध्यक्ष निलेश होडारकर, फेडरेशन १० चे अध्यक्ष बसवराज पुजारी, माजी फेडरेशन १० चे अध्यक्ष गणपत रायकर, प्राचार्य उमेश नाईक, शांतादुर्गा विद्यालयाचा मुख्याध्यापिका राजनीता सावंत, होनवाड आदी उपस्थित होते. प्राचार्य उमेश नाईक यांनी शिबिराचा उदेश्य स्पष्ट केला. याप्रसंगी अध्यक्ष निलेश होडारकर यांनी स्वागत केले तर गणपत रायकर यांनी मान्य वराचे पुष्प देऊन स्वागत केले. डॉ डिकोस्ता यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या दातांची काळजी कशी ध्यावी याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. डिकोस्ता डॉ. अपूर्वा देशपांडे, शुभम गावस, डॉ, कश्यप बांदेकर, डॉ. अंजली ताळगावकर आदी डॉ. नी विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना काही सुचना व मोफत औषधही पुरवली. या दंत चिकित्सा शिबिराचा २०० मुलांनी लाभ घेतला
कार्यक्रम चे सुत्रसंचालन केशव देशपांडे यांनी केले तर अध्यक्ष निलेश होडारकर यांनी आभार मानले. फोटो भारत बेतकेकर
पिर्ण येथील शांतादुर्गा विद्यालयात दंत चिकित्सा शिबिराचा उदघाटन करताना डॉ . कोसता,बाजूला निलेश होडारकर, प्राचार्य उमेश नाईक. गणपत रायकर. बसवराज पुजारी, राजनीता सावंत