वेळीच उपचार घेतल्यास कर्करोग १०० टक्के बरा होऊ शकतो. – डॉ. नूतन देव*

.

 

 

*वेळीच उपचार घेतल्यास कर्करोग १०० टक्के बरा होऊ शकतो. – डॉ. नूतन देव*

फोंडा, दि. ७ फेब्रुवारी – ‘कर्करोग (कॅन्सर) म्हणजे शेवटचा श्वास नसून अन्य आजारांसारखा आजार आहे. महिलांनी जागृत राहून, काही शारीरिक लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरकडे जाऊन उपचार घ्यावा. वेळीच उपचार घेतल्यास हा आजार १०० टक्के बरा होतो. रुग्णाने जगण्याची इच्छा प्रबळ ठेवावी,’ असे प्रतिपादन इंडियन मेडिकल असोसिएशन, फोंडाच्या सदस्या, बालरोगतज्ञ डॉ. (सौ.) नूतन देव यांनी केले. इंडियन मेडिकल असोशिएशन (आयएमए, फोंडा) आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक कर्करोग (कॅन्सर) दिनानिमित्त कॅन्सरविषयी प्रबोधनपर व्याख्यान नुकतेच घेण्यात आले. यावेळी आयएमए, फोंडाचे अध्यक्ष स्त्रीरोगतज्ञ डॉ. दिलीप केरकर तसेच सनातन संस्थेचे डॉ. पांडुरंग मराठे यांच्यासह ७० महिला उपस्थित होत्या.

डॉ. नूतन देव म्हणाल्या की, ‘कर्करोग (कॅन्सर) हा अन्य आजारांसारखा एक आजार आहे. महिलांनी जागृत राहून, काही शारीरिक लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरकडे जाऊन तपासणी करून उपचार घ्यावा. वेळीच उपचार घेतल्यास हा आजार १०० टक्के बरा होतो. रुग्णाने घाबरून न जाता जगण्याची उमेद सोडू नये.’ यावेळी डॉ. देव यांनी हा आजार होऊ नये, यासाठी महिलांनी काय काळजी घ्यावी, स्वत:ची तपासणी स्वतः कशाप्रकारे करावी रक्त, स्तन आणि गर्भाशय यांसारखे कर्करोगाच्या अन्य प्रकारंची लक्षणे कशी ओळखावीत, याविषयी मार्गदर्शन केले.

स्त्रीरोगतज्ञ, डॉ. दिलीप केरकर यांनी सांगितले की, ‘वय वर्षे ३० नंतर प्रत्येकाने वर्षातून एकदा आपली संपूर्ण आरोग्य तपासणी करून घ्यावी. त्यामुळे कर्करोगासारखा आजार प्राथमिक अवस्थेत (फर्स्ट स्टेजला) लक्षात येऊन त्यावर योग्य उपचार घेतल्याने तो बरा होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेने अन्य आजारातील रुग्णांकडे पाहिले जाते, त्याचप्रमाणे कर्करोगाच्या रुग्णांकडे पहावे, यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे घोषित केले आहे.’

यावेळी डॉ. दिलीप केरकर यांचा सत्कार डॉ. पांडुरंग मराठे यांनी तर डॉ. नूतन देव यांचा सत्कार डॉ. (सौ.) अश्विनी देशपांडे यांनी सनातन निर्मित ग्रंथपुस्तिका संच देऊन केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. साक्षी मोदी यांनी केले.

आपला नम्र
*श्री. तुळशीदास गांजेकर*
(संपर्क क्रमांक : 93709 58132)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar